यंदाचा पोळा, दारूमुक्त पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:55+5:302021-09-06T04:40:55+5:30
बैलाचा पोळा हा विशेषतः गावात साजरा होणारा सण आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे आभार मानण्यासाठी पोळा हा सण साजरा ...
बैलाचा पोळा हा विशेषतः गावात साजरा होणारा सण आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे आभार मानण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. मात्र, पोळ्याच्या सणाला अनेक गावांत मोठ्या प्रमाणात दारू गाळून प्राशन केली जाते. अनेक दिवसांपासून गावात बंद असलेली दारू पोळ्याच्या निमित्ताने सुरू होण्याची शक्यता असते. दारू सुरू झाली की, पुन्हा गावातले वातावरण बिघडते, या दिवशी दारू पिऊन अनेक जण सणाचे पावित्र्य घालवतात आणि गावातील शांतता भंग करतात. गावात तंटे निर्माण होतात. यासाठी दरवर्षी ‘दारूमुक्त पोळा’ ही संकल्पना मुक्तिपथ अभियानाद्वारे राबविली जात आहे. आतापर्यंत जिल्हावासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यंदाही दारूमुक्त पोळा साजरा करण्याचे आवाहन मुक्तिपथ अभियानातर्फे करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाभरातील गावागावांमध्ये मुक्तिपथ अभियानातर्फे जनजागृती करीत, दारूमुक्त पोळाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.