येमलीत पोलवा उत्सव साजरा

By admin | Published: September 24, 2016 03:08 AM2016-09-24T03:08:07+5:302016-09-24T03:08:07+5:30

तालुक्यातील येमली गावात आदिवासी पारंपरिक रितीरिवाजानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवा पोलवा उत्सव साजरा करण्यात आला.

Yemlit Polva Festival is celebrated | येमलीत पोलवा उत्सव साजरा

येमलीत पोलवा उत्सव साजरा

Next

झाडांची झाली पूजा : काकडी, मका, अंबाडी खाण्यास सुरूवात
एटापल्ली : तालुक्यातील येमली गावात आदिवासी पारंपरिक रितीरिवाजानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवा पोलवा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावाला लागून असलेल्या जंगलात जाऊन झाडांचे विधीवत पूजन करण्यात आले.
या प्रसंगी येमलीचे पोलीस पाटील महारू मट्टामी, उपसरपंच रामा तुमरेटी, गाव भूमिया हाडवे, मडावी, माजी सरपंच बालाजी हिचामी, गाव पेरमा (गावातील प्रमुख व्यक्ती), पुजारी गावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हाकुमी वाजवून झाडाची पूजा करण्यात आली. नवा पोलवा उत्सव झाल्यानंतर ग्रामस्थांनी काकडी, मका, अंबाडी व इतर भाजीपाला खाण्यास सुरूवात केली. दरवर्षी आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. जंगलापासून तसेच शेतातून मिळणाऱ्या नव्या मालाची पूजा करून त्याला खाण्यास सुरूवात करतात. यामागे निसर्गाच्या पुजेचेही परंपरा पाळली जात आहे. अनेक आदिवासी बहूल गावांमध्ये गावांची सामुहिक शेती व्यवस्थाही निर्माण झाली आहे. यावर संपूर्ण गावकऱ्यांचा अधिकार आहे, अशी धारणा लक्षात घेत असे उत्सव मोठ्या एकोप्याने आदिवासी गावांमध्ये आजही साजरे केले जातात. त्यांतर्गत पोलवा उत्सव साजरा झाला.

Web Title: Yemlit Polva Festival is celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.