येवली साक्षर भारत पुरस्काराने सन्मानित
By admin | Published: September 15, 2016 01:59 AM2016-09-15T01:59:41+5:302016-09-15T01:59:41+5:30
आदर्श संसद ग्राम म्हणून खासदार अशोक नेते यांनी निवड केलेल्या येवली ग्रामपंचायतीला दिल्ली येथे विज्ञान भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव : सरपंच महिलेने स्वीकारला गौरव
येवली : आदर्श संसद ग्राम म्हणून खासदार अशोक नेते यांनी निवड केलेल्या येवली ग्रामपंचायतीला दिल्ली येथे विज्ञान भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. यावेळी येवलीच्या सरपंच गीता विजय सोमनकर यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला सांसद ग्राम येवलीचे अध्यक्ष विलास भांडेकर, मोरेश्वर भांडेकर, प्रेरक मिथून बांबोळे, यजमान मेश्राम, लक्ष्मी कलंत्री आदी उपस्थित होते. येवली ग्रामपंचायत व राज्य साधन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून डीजीटल साक्षर अभियान, कला कौशल्य, रोगनिदान शिबिर, जलसंवर्धन, वाचन केंद्र, स्पर्धा परीक्षा व वैक्तीमत्व विकास आदींवर येवली ग्रामपंचायतीने विविध कार्यक्रम राबविले. या कार्यक्रमांचा लाभ गोविंदपूर, रामपूर या गावातील नागरिकांनाही झाला. खा. अशोक नेते व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळाल्याचे सरपंच गीता सोमनकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)