युवा कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:45+5:302021-06-25T04:25:45+5:30
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे होते. याप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, भाजपचे ज्येष्ठ नेते ...
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे होते. याप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वामन तुरके, प्रदेश सचिव राहुल खंगार, प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, जि. प.च्या महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी, युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, भारत बावनथडे, मधुकर भांडेकर, पवन नारनवरे, व भाजपयुमोचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी किशन नागदेवे, वामन तुरके, कल्याण देशपांडे, राहुल खंगार यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, संचालन हर्षल गेडाम, तर स्वप्निल वरघंटे यांनी आभार मानले.
बाॅक्स
आज सन्मान व संवाद कार्यक्रम
१९७५ च्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ २५ जून राेजी भारतीय जनता युवा मोर्चाद्वारा आयोजित ‘संवाद’ कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाविषयी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येईल, तसेच त्यांच्याशी संवाद साधला जाईल, असे बैठकीत ठरविण्यात आले.
===Photopath===
230621\141123gad_2_23062021_30.jpg
===Caption===
मार्गदर्शन करताना खा. अशाेक नेते, साेबत भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे.