तरुणाईने रॅलीतून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 06:00 AM2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:30+5:30

गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. व्ही. कल्याणकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्यासह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सदर रॅली एमआयडीसी मार्गावरील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हा न्यायालय ते चंद्रपूर मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते टी पार्इंट अशी फिरविण्यात आली.

A young rally created a rally of Indian culture | तरुणाईने रॅलीतून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

तरुणाईने रॅलीतून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

Next
ठळक मुद्देकॉम्प्लेक्स परिसरात रॅली : पर्यावरण व मानवी सुरक्षिततेचे आवाहन करणारे देखावे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाच्या निमित्ताने सोमवारी (दि.२) कॉम्प्लेक्स परिसरात महाविद्यालयीन युवक, युवती व विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध प्रकारचे पथनाट्य, फलकाच्या माध्यमातून तसेच घोषणाबाजी करून तरुणाईने भारतीय आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविले. याशिवाय पर्यावरण व मानवी सुरक्षितता टिकली पाहिजे, असे आवाहनही केले. या रॅलीत राज्यभरातील ७०० पेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.
गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. व्ही. कल्याणकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्यासह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सदर रॅली एमआयडीसी मार्गावरील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हा न्यायालय ते चंद्रपूर मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते टी पार्इंट अशी फिरविण्यात आली. येथून रॅली पुन्हा विद्यापीठात पोहोचली. सदर रॅलीमध्ये गोंडवाना विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतीकारकांच्या इतिहासाबद्दल बॅनर व फलकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच रेलानृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीची ओळख करून दिली. इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जंगल वाचवा, प्राणी वाचवा असा संदेश पथनाट्यातून दिला. मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महिला व युवतीवरील अत्याचार थांबले पाहिजे, असे आवाहन फलकातून केले. नुकत्याच हैदराबाद येथे घडलेल्या डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावरील अत्याचाराच्या घटनेचा निषेधही विद्यार्थ्यांनी केला. अशा प्रकारच्या घटनांना आळा घातल्या गेला पाहिजे, असे आवाहन केले. दरम्यान रॅलीत काही विद्यार्थी ‘मुली वाचवा, अत्याचार थांबवा’ ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ असा संदेश फलकातून दिला. सदर रॅलीतून विद्यार्थ्यांनी आदिवासी, महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

Web Title: A young rally created a rally of Indian culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.