पेट्राेल, डिझेल वाढीविरूद्ध आपचे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:34 AM2021-02-07T04:34:15+5:302021-02-07T04:34:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : केंद्र सरकारने पेट्राेल, डिझेलची दरवाढ केली असून इतर वस्तूंचेही भाव गगनाला भिडले आहेत. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : केंद्र सरकारने पेट्राेल, डिझेलची दरवाढ केली असून इतर वस्तूंचेही भाव गगनाला भिडले आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. महागाईच्या मुद्यावर आपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विराेधात गडचिराेली येथे निदर्शने केली.
पेट्राेलचे दर १०० रुपयांकडे वाटचाल करताना केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्राेल, डिझेलवरील अबकारी कर सवलतीची अपेक्षा पूर्णत: फाेल ठरली आहे. त्यामुळे पेट्राेल, डिझेलवरच्या अबकारी करात कपात करावी, अशी मागणी आपने केली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे गडचिराेली जिल्ह्यासह देशातील सर्वसामान्य कुटुंबे हैराण झाली आहेत. मात्र केंद्र सरकारला महागाईच्या मुद्यावर काहीही देणेघेणे नाही, असा आराेप आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
आपचे जिल्हा संयाेजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदाेलनात आपच्या कामगार सेलचे अध्यक्ष चाेखाजी अंबादे, वाहतूक सेलचे अध्यक्ष रमेश उप्पलवार, रूपेश सावसाकडे, संजय जीवताेडे, अनुरथ निलेकर, काेमेश कत्राेजवार, सुरज गेडाम, सुनील तामशेट्टीवार, पुंजाराम शेंडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित हाेते.