कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसचे फिरते मदत केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:35 AM2021-04-25T04:35:47+5:302021-04-25T04:35:47+5:30

गडचिरोली : जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कोविड रुग्णालयात दुर्गम भागातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, त्यांची ...

Youth Congress Mobile Help Center for Corona Victims | कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसचे फिरते मदत केंद्र

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसचे फिरते मदत केंद्र

Next

गडचिरोली : जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कोविड रुग्णालयात दुर्गम भागातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, त्यांची हेळसांड होऊ नये, तसेच रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांच्या समस्या निवारणासाठी गडचिरोली युवक काँग्रेसने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात फिरते मदत केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.

या मदत केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून देणे, त्यांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे, इंजेक्शन व इतर अडचणींचे निवारण करणे, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था करून देणे, बाहेरील जिल्ह्यात अडकलेल्या रुग्णांच्या अडचणी दूर करणे, उपचारादरम्यान हेळसांड होत असल्यास समस्या निवारण करणे, रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास त्वरित रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून देणे, मृत पावलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकूड उपलब्ध करून देणे, अशा विविध अडचणींसाठी गडचिरोली युवक काँग्रेस मदत करणार आहे. गरजवंतांनी महेंद्र ब्राम्हणवाडे (८८३०७३७८९०), रजनीकांत मोटघरे (९४२१७३४१९५), नीतेश राठोड (९४२२६८०४१२), मिलिंद खोब्रागडे, आकाश परसा, गौरव येनप्रेडीवार, पिंकू बावणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Youth Congress Mobile Help Center for Corona Victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.