युवक काँग्रेसचा चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गासाठी घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:27 AM2021-06-01T04:27:46+5:302021-06-01T04:27:46+5:30
गडचिरोली जिल्हा मुख्यालय ते चामोर्शी तालुका मुख्यालयापर्यंत सध्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मागील वर्षीपासून या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी जुन्या ...
गडचिरोली जिल्हा मुख्यालय ते चामोर्शी तालुका मुख्यालयापर्यंत सध्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मागील वर्षीपासून या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी जुन्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. विशेष बाब म्हणजे गडचिरोली जिल्हा मुख्यालय व चामोर्शी तालुका मुख्यालयात रस्त्याचे खोदकाम झाले आहे. तरीही त्या भागातील रस्त्याचे बांधकाम का करण्यात येत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही दिवसांत बांधकाम झाले नाही, तर येत्या पावसाळ्यात या ठिकाणाला डबक्याचे स्वरूप येणार आहे. रस्त्याची एक बाजू खोदून ठेवली असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. महामार्गाचे काम गतीने करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. येत्या दहा दिवसांत या रस्त्याचे काम प्रगतीपथावर राहील, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, नंदू वाईलकर, प्रतीक बारसिंगे, जितेंद्र मुनघाटे, वसंत राऊत, संजय चन्ने, घनश्याम मुरवतकर, तौफिक शेख, गौरव ऐनप्रेद्दीवार, योगेश नैताम, आशिष कामडी, विपुल येलेटीवार, मयूर गावतुरे, कुणाल ताजने, सतीश मुनघाटे, हेमंत मोहितकर, दिलीप चोधरी, रवी गराडे, समीर ताजने यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.