पेट्रोल दरवाढीविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:06 PM2018-10-11T23:06:27+5:302018-10-11T23:06:44+5:30
पेट्रोल व डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहेत. पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात करण्यात आले. केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/आरमोरी : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहेत. पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात करण्यात आले. केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने देण्यात आली.
मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली होती. राज्य शासनाने पाच रूपये किंमत कमी केली असली तरी काही दिवसातच पुन्हा पेट्रोल नव्वदी पार करणार आहे. पेट्रोलसोबतच डिझेलच्याही किमती वाढत आहेत. डिझेलचा उपयोग वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी होत असल्याने डिझेलचे दर वाढल्याने महागाईतही वाढ होत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यासाठी केंद्र शासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करून केंद्र शासनाविरोधात निदर्शने केली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, हसनअली गिलानी, पांडुरंग घोटेकर, तुळशीदास भोयर, वसंत राऊत, बाळासाहेब आखाडे, पंकज गुड्डेवार, अमोल भडांगे, रजनीकांत मोटघरे, सुधीर इंगोले, अभिजीत धाईत, प्रतिक बारसिंगे, मिलिंद किरंगे, आशिष कन्नमवार, विजय वाघुळकर, कवडू कुळमेथे, जितू मुनघाटे, वैभव कडस्कर, गौरव आलाम, अधीर गेडाम, सचिन दरडे, मनोहर पोरेटी, निखील खोब्रागडे, संतोष बारसिंगे, प्रकाश मोहुर्ले, रमेश धाईत, संदीप भजभुजे, अजय गंडाटे, इमरान शेख, अमोल निकुरे, बाशिद शेख, आरिफ कनोजा आदी उपस्थित होते.
आरमोरी येथे निदर्शने
पेट्रोल व डिझेल किमत वाढीच्या विरोधात आरमोरी येथे निषेध करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी केले. यावेळी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष अधीर इंगोले, वैभव पळसकर, निलेश अंबादे, राहूल धाईत, जितेंद्र सोमनकर, राकेश वाटगुरे, गणेश सोनकुसरे, सचिन हेडाऊ, नरेंद्र गजभिये, राहूल हनवते, पंकज मंगरकर, हेमंत ठाकरे, निखील शमनकर, सतीश जवंजाळकर, वैभव खोब्रागडे, पिंकू बावणे, संजय धोटे, वैभव कुथे, प्रविण ब्रह्मनायक, अजय बोरकर, जितेंद्र पेंदाम, प्रफुल्ल धोटे, अमोल टेकाम, गोपाल दिघोरे, निखील कुथे, विक्की रामटेके, रामा कुळमेथे, अमोल राऊत, शाबीर शेख, अमोल उके आदी उपस्थित होते.