विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:34+5:302021-07-10T04:25:34+5:30
आईच्या पालनपोषणात मोठा झालेला स्वप्निल आता २२ वर्षांचा झाला होता. त्यामुळे स्वप्निलच्या आईला त्याचा मोठा आधार होता. तो शेतमजुरी ...
आईच्या पालनपोषणात मोठा झालेला स्वप्निल आता २२ वर्षांचा झाला होता. त्यामुळे स्वप्निलच्या आईला त्याचा मोठा आधार होता. तो शेतमजुरी करून घरखर्च सांभाळू लागला होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते, शेतातील मोटारपंप सुरू करण्याचे निमित्त झाले आणि त्याचवेळी विजेचा जोरात झटका लागून तो खाली कोसळला. त्याला लगेच रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण डॉ.सय्याम यांनी तपासणी करून मृत घोषित केले. धानोरा येथे शवविच्छेदन केल्यानंतर संध्याकाळी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्निलच्या अचानक जाण्याने रांगी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
(बॉक्स)
पतीची आत्महत्या, मुलाचा अपघाती मृत्यू
स्वप्निलच्या घरात तो एकमेव पुरुष होता. त्याच्या वडिलांनी तो लहान असतानाच आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली होती. त्यानंतर स्वप्निलची आई मंदा ज्ञानेश्वर वालदे यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या पालनपोषणाचा भार एकट्या आईवर आल्याने त्यांनी शेतमजुरी करून दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मागील वर्षी मुलीचे थाटात लग्नसुद्धा लावून आपले कर्तव्य पार पाडले पण दु:खाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अनेक वर्षापूर्वी पतीने आत्महत्या केल्यानंतर आता तरुण मुलाचा अपघात मृत्यू झाल्याने मंदा वालदे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
090721\img-20210709-wa0006.jpg
विजेच्या धक्क्याने 22 वर्षीय युवकाचा मृत्यू*
कुटुंबाची जबाबदारी हाती येत नाही तर नियतीने मोडला डाव,