आदिवासी एकता दिनानिमित्त धावली तरूणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:19 AM2020-12-28T04:19:02+5:302020-12-28T04:19:02+5:30

मॅरेथाॅन स्पर्धेचे उद्घाटन ठाणेदार सुधाकर देडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आशिष काळे होते. प्रमुख ...

Youth ran on the occasion of Tribal Unity Day | आदिवासी एकता दिनानिमित्त धावली तरूणाई

आदिवासी एकता दिनानिमित्त धावली तरूणाई

Next

मॅरेथाॅन स्पर्धेचे उद्घाटन ठाणेदार सुधाकर देडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आशिष काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष आशा तुलावी, रमेश कोरचा, अभियंता माधव गावळ, माजी सरपंच सुमन घोडाम, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनटक्के, पं. स. सदस्य मनोज दुनेदार, माजी जि. प. सदस्य अशोक इंदूरकर उपस्थित होते.

बक्षीस वितरण जि. प. चे उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष शैलेश हलामी, प्रशिक्षक देवेंद्र राणे, सचिव रूपेश चांदेवार, पंकेश उईके, निखिल चौधरी, सहसचिव बकुला लाखे, प्रकाश मिरी व सदस्यांनी सहकार्य केले.

बाॅक्स ...

हे ठरले विजेते

मॅरेथाॅन स्पर्धेत मुलांच्या १६०० मीटर दाैड स्पर्धेत प्रथम क्रमांक निखिल राऊत, द्वितीय महेन्द्र कचलाम, तृतीय क्रमांक चेतन नरोटे यांनी पटकाविला. तर प्रशांत खुरसे व निशांत कापसे यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. मुलींच्या ८०० मीटर दाैड स्पर्धेत प्रथम क्रमांक हेमलता संग्रामे, द्वितीय करिश्मा जनबंधू, तृतीय क्रमांक करिश्मा उईके यांनी पटकाविला. तर स्नेहा उईके व सोनम गोळे यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले.

Web Title: Youth ran on the occasion of Tribal Unity Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.