झिंगानूर परिसर समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:14 PM2017-11-11T23:14:17+5:302017-11-11T23:14:29+5:30

सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया झिंगानूर परिसरात भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, वीज समस्या, रस्त्यांची दुर्दशा, बससेवेचा अभाव यासह विविध समस्या आहेत.

Zhenganur complex problematic | झिंगानूर परिसर समस्याग्रस्त

झिंगानूर परिसर समस्याग्रस्त

Next
ठळक मुद्देविकासापासून वंचित : मूलभूत समस्यांसह दुर्गम भागात बससेवेचाही अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया झिंगानूर परिसरात भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, वीज समस्या, रस्त्यांची दुर्दशा, बससेवेचा अभाव यासह विविध समस्या आहेत. परंतु सदर समस्या सोडविण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. रस्त्यांअभावी या भागातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
झिंगानूर परिसरातील लोव्वा, कल्लेड येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. त्यामुळे नागरिकांना विजेची प्रतीक्षा आहे. अनेकदा प्रशासनाकडे विजेसाठी मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव आहे. परंतु याकडे दुर्लक्षच होत आहे. झिंगानूर ते सिरोंचा पर्यंतचे अंतर ६५ किमी आहे. तर जिल्हा मुख्यालय २५० किमीवर आहे. या भागात ८५ टक्के आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. झिंगानूर माल, झिंगानूर चेक नं.१, चेक नं.२, मंगीगुडम, वडदेली, येडसिली, लोव्वा, कल्लेड कर्जेली, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, कोर्लाचेक, कोर्ला माल, पुल्लीगुडम, कोपेला, सिरकोंडा, गांगनूर, कोत्तागुडम, पातागुडम, रायीगुडम, पेडलाया, अमडेली, येनालाया यासह लहान, मोठ्या गावांचा समावेश आहे. या भागात पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. तर काही ठिकाणी १२ वीपर्यंत शिक्षणाचीही सोय नाही. त्यामुळे या भागातील विकास केव्हा होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. झिंगानूर परिसर मूलभूत सोयीसुविधांअभावी समस्याग्रस्त आहे. या भागातील लोकप्रतिनिधी समस्यांचा पाठपुरावा करण्याकडे कानाडोळा करीत असल्याने परिसराचा विकास खुंटला आहे.
भ्रमणध्वनी सेवा कुचकामी
झिंगानूर परिसरात नेहमीच भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत होते. इंटरनेट सेवेचाही अभाव अनेकदा असतो. त्यामुळे या भागातील इंटरनेट स्पिड वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेकदा दुसºयाशी संपर्क साधताना अडचणी येतात. शिवाय येथे खासगी भ्रमणध्वनी कंपन्यांचाही अभाव आहे.
बससेवा बंद झाल्याने नागरिकांची अडचण
सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बससेवा होती. जवळपास १९८० पासून प्रमुख ठिकाणी बस नियमित यायची. परंतु काही वर्षांपासून या भागातील बससेवा बंद झाली आहे. विशेष म्हणजे सिरोंचा, आसरअल्ली, कोपेला, झिंगानूर, कल्लेड, देलचलीपेठा या मार्गे बससेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु दुर्गम भागातील गावात अद्यापही बस पोहोचली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ज्या नागरिकांकडे वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत, असे नागरिक सोयीने येतात. परंतु ज्यांच्याकडे सुविधा उपलब्ध नाही, अशांची मोठ्या प्रमाणावर पायपीट होत आहे.

Web Title: Zhenganur complex problematic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.