जिल्हा परिषद सीईओंनी साधला सरपंचांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:10+5:302021-09-27T04:40:10+5:30
"स्वच्छता ही गडचिरोलीची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून मार्च २०२४ अखेर गडचिरोली जिल्हा हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) करूया" ...
"स्वच्छता ही गडचिरोलीची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून मार्च २०२४ अखेर गडचिरोली जिल्हा हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) करूया" असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सरपंचांशी संवाद साधताना केले. जिल्ह्यात प्लॅस्टिक, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, १०० टक्के सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करून जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर करावयाचे आहे.
तसेच राज्यस्तरावरील प्रकल्प संचालक राजेंद्र शिंदे यांनी थेट गडचिरोली जिल्ह्यातील सरपंचांसोबत संवाद साधला. उपक्रमांचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) माणिक चव्हाण यांनी केले. तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणुसमारे यांनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व उपक्रमांबद्दल माहिती दिली.
या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, पंचायत समितीचे सभापती उपसभापती व सर्व सदस्य गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी, गटसमन्वयक समूह समन्वयक, जिल्हा कक्षातील सल्लागार व तज्ज्ञ उपस्थित होते.