जुन्या पेन्शनसाठी जिल्हा परिषदेवर कर्मचाऱ्यांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:50 AM2018-04-08T00:50:39+5:302018-04-08T00:50:39+5:30
सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शेकडो सदस्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शेकडो सदस्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला पाठविले. सामाजिक दायित्व पार पाडण्याच्या उद्देशाने आंदोलनापूर्वी जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
३१ आॅक्टोबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन परिभाषीत अंशदायी पेन्शन योजना व राराष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजनेचे स्वरूप, त्याचे अंमलबजावणी बघता सदर योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
प्राथमिक शिक्षकांची शाळा प्रगत असेल व शाळासिध्दीमध्ये अ श्रेणीत असेल तसेच नववी व दहावीचा निकाल ८० टक्केच्या वर असेल तर सदर शिक्षक वरिष्ठ श्रेणीसाठी पात्र ठरतील, अशी अट २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयाद्वारे शालेय शिक्षण विभागाने घातली आहे. मात्र सदर अट अन्यायकारक आहे. २३ आॅक्टोबरचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
आंदोलनात राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, उपाध्यक्ष अंकूश मैलारे, सचिव बापू मुनघाटे, कोषाध्यक्ष विजय मोडपल्लीवार, राज्य उपाध्यक्ष योगेश शेरेकर, राज्य समन्वयक दशरथ पाटील, महिला संघटीका वनश्री जाधव, सल्लागार विजय कौशीक, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, शंकर तोगरे, शिवाजी जाधव, सतीश खांडेकर, सुधाकर वेलादी, धनराज मोगरकर, अल्पेश बारापात्रे, त्रिमूर्ती भिसे, डंबाजी पेंदाम, खिरेंद्र बांबोळे, साईनाथ अलोणे, देवेंद्र डोहणे, स्मिता पुणेकर, दीपक भैसारे, माया दिवटे, प्रमोद कावडकर, श्रीकांत कुथे, आशिष धात्रक, पुरूषोत्तम पिपरे, रामटेके, पठाण, नरेंद्र कोत्तावार, किशोर कोहळे, बाळराजे, रघुनाथ भांडेकर, गणेश काटेंगे, डंबाजी पेंदाम, संजय लोणारे, अशोक बोरकुटे, नैना पोरकंटीवार, निलेश शेंडे, त्रिमुर्ती भिसे, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, लतीफ पठाण, विजय कन्नाके, सुरेश पालवे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव बापू मुनघाटे यांनी केले.
जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या हस्ते डीसीपीएस विवरणपत्र वितरित
अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत कर्मचाºयांच्या वेतनातून पेन्शनसाठी काही रक्कम कपात केली जात आहे. मात्र मागील वर्षीपासून कपातीचे विवरणपत्र उपलब्ध झाले नव्हते. सदर विवरणपत्र देण्यात यावे, अशी मागणी कर्मचाºयांकडून करण्यात येत होती. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लावली. बाराही तालुक्यातील सर्व कर्मचाºयांचे विवरणपत्र तयार केले. सदर विवरणपत्र आंदोलन स्थळीच अजय कंकडालवार यांनी कर्मचाºयांना वितरित केले. यावेळी उपस्थित कर्मचाºयांनी जि.प. उपाध्यक्षांच्या कामाचे कौतुक केले.