जि.प.-पं.स. सदस्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:55+5:302021-06-04T04:27:55+5:30

निवेदनात म्हटले आहे की, देशात मागील वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचे संकट आहे. त्यामुळे विकास कामे रखडली आहेत. गेल्या चार ...

ZP-PNS Extend the term of members by one year | जि.प.-पं.स. सदस्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवा

जि.प.-पं.स. सदस्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवा

Next

निवेदनात म्हटले आहे की, देशात मागील वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचे संकट आहे. त्यामुळे विकास कामे रखडली आहेत. गेल्या चार वर्षापासून संघर्ष करून १५ व्या वित्त आयाेगाचा निधी २०२० मध्ये १० टक्के मंजूर झाला. सदर निधी जि.प. व पं.स. ला वितरित झाला. परंतु काेराेना विषाणूचा संसर्ग वाढल्याने अनेक तालुक्यात मासिक बैठका झाल्या नाही. जिल्ह्यातील बाराही पंचायत समितीमध्ये १५ व्या वित्त आयाेगाचा निधी अखर्चित आहे. २०२०-२०२१ या वर्षात जि.प. व पं.स. सदस्यांना आपल्या क्षेत्रातील समस्या साेडविता आल्या नाही. ग्रामीण भागातील विकास कामे करण्याकरिता सदस्यांचा कालावधी एक वर्षाने वाढवावा, अशी मागणी संघटनेने केली.

निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष विलास दशमुखे, सचिव विवेक खेवले, गडचिराेलीचे पं.स. सभापती माराेतराव इचाेडकर, आरमाेरीच्या सभापती नीता ढाेरे, सदस्य नेताजी गावतुरे उपस्थित हाेते.

Web Title: ZP-PNS Extend the term of members by one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.