जि.प.शाळा लागल्या प्रजासत्ताकदिनाच्या तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:33 AM2021-01-21T04:33:03+5:302021-01-21T04:33:03+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : राज्य शासनाच्या निर्णयानुसार २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग प्रत्यक्ष शाळांमध्ये भरविण्यात येणार ...

ZP schools started preparing for Republic Day | जि.प.शाळा लागल्या प्रजासत्ताकदिनाच्या तयारीला

जि.प.शाळा लागल्या प्रजासत्ताकदिनाच्या तयारीला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : राज्य शासनाच्या निर्णयानुसार २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग प्रत्यक्ष शाळांमध्ये भरविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील काही शाळा आतापासूनच प्रजासत्ताकदिन समारंभ साजरा करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. स्थानिक पंचायत समिती अंतर्गत काटली केंद्रातील जि.प.शाळेत प्रजासत्ताकदिन व वर्ग भरविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांना बुधवारी गणवेश वाटप करण्यात आले. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त अनुदानातून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनुसार प्रत्येकी एका गणवेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती याेगिता वाकडे, उपसभापती राजू नैताम, याेंगेंद्र बारसागडे, भूमिका बारसागडे, रेखा वैद्य, शालू बांगरे, संजय सातपुते, कमलाकर चरडुके, ज्याेती मेश्राम, मालन वाकडे, साेनू गेडाम आदी मान्यवर उपस्थित हाेते.

बाॅक्स....

लाेकवर्गणीतून इतर साहित्य उपलब्ध

दरम्यान लाेकवर्गणीच्या माध्यमातून मुलांना टाय, बेल्ट, साॅक्स उपलब्ध करून देण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे साहित्य बुधवारी वितरित करण्यात आले. काेेविडविषयक जनजागृती करण्यासाठी शाळेच्या पुढाकाराने ‘बाेलक्या भिंती व बाेलकी झाडे’ हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजू घुगरे, शिक्षिका सुषमा मडावी व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Web Title: ZP schools started preparing for Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.