फातर्पातील बोंबडामळ येथे आणखी 10 पॉझिटिव्ह; भीतीमुळे लोकांच्या तपासणीसाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:41 PM2020-07-01T17:41:28+5:302020-07-01T17:41:37+5:30
आंबेली येथे लग्नाची मिठाई करण्यासाठी गेलेल्या या वाडय़ावरील काही महिलांना आंबेलीत या रोगाची लागण झाली होती.
कुंकळ्ळी : कोरोनाचा गोव्यातील नवीन हॉटस्पॉट होऊ शकणाऱ्या फातर्पा येथील बोंबडामळ या भागात बुधवारी आणखी दहा नवीन रुग्ण आढळल्याने या भागातील एकूण रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. या पाश्र्वभूमीवर या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने तपासणी करून घेण्यासाठी लोकांच्या बाळ्ळी आरोग्य केंद्रावर लोकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते.
आंबेली येथे लग्नाची मिठाई करण्यासाठी गेलेल्या या वाडय़ावरील काही महिलांना आंबेलीत या रोगाची लागण झाली होती. त्यानंतर संपूर्ण वाडय़ावर हा प्रसार सुरू झाला. मंगळवारपासून हे रुग्ण वाढू लागले आहेत.
कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस हे कोरोनाबाधित झाल्यामुळेही कुंकळ्ळी आणि बाळ्ळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची स्थिती समजून घेण्यासाठी डायस हे बाळ्ळी परिसरात फिरले होते. ते पंच सदस्यांनाही भेटले होते. त्यामुळे पंच सदस्यांनीही बाळ्ळी केंद्रावर येऊन स्वत:ची चाचणी करून घेतली.
आमदार डायस यांच्या कुटुंबियांची आणि कार्यालयीन कर्मचा:यांची बुधवारी तपासणी करण्यात आली असून त्यांच्या जवळच्या कार्यकत्र्यांचीही तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जॉर्जिना गामा यांनी दिली. आज गुरुवारी त्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे.
कंटेन्मेंट झोन करण्याची तयारी
फातर्पा येथील बोमडामळ आणि आम्यामळ ता दोन वाडय़ावर मोठय़ा प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून आल्याने हे दोन्ही वाडे कंटेन्मेंट झोन करण्यासाठी मागणी होत आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी केपेचे प्रभारी मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांनी पाहणी केली. या संबंधीचा अहवाल आपण जिल्हाधिका:यांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पंच सदस्यांनी हे वाडे बंद करावेत अशी मागणी केली आहे.