मांडवी-जुवारीसह गोव्यातील दहा नद्या प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 03:09 PM2018-10-09T15:09:30+5:302018-10-09T15:10:32+5:30

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल : त्वरित उपाययोजना हाती घेण्याचा आदेश

10 rivers of Goa polluted with Mandvi-Zuvari | मांडवी-जुवारीसह गोव्यातील दहा नद्या प्रदूषित

मांडवी-जुवारीसह गोव्यातील दहा नद्या प्रदूषित

googlenewsNext

मडगाव: गोव्याच्या प्राणवाहिन्या अशी ओळख असलेल्या मांडवी व जुवारी या दोन प्रमुख नद्यांसह राज्यातील दहा नद्या प्रदुषित झाल्या असून या नद्यांतील पाण्याचे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण ज्यादा असल्याचे मत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केले आहे. यासाठी केंद्रीय मंडळाने राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाला जबाबदार धरले असून यासंबंधी तातडीने उपाययोजना करण्याची सुचना केली आहे.


गोव्यातील दहा नद्या मैल्या होण्याचे कारण म्हणजे मलमुत्र विसर्जन आणि औद्योगिक सांडपाण्याचे विसर्जन मुख्य असून त्याशिवाय कचरा, प्लास्टीक व बेकायदा बांधकामे यांचा प्रमुख हात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशभरातील 350 पेक्षा जास्त नद्यांचे पाणी प्रदुषित झाले असून त्यात गोव्यातील दहा नद्यांचा समावेश आहे. त्यात मांडवी, जुवारी, साळ, तळपण, अस्नोडा, डिचोली, सिकेरी, तेरेखोल व वाळवंटी या नद्यांचा समावेश आहे.


राष्ट्रीय हरित लवादातील या घटनेची गंभीर दखल घेऊन यासाठी राज्य प्रदुषण मंडळाला जबाबदार धरले आहे. हे प्रदुषण आताच रोखून धरले नाही तर भविष्यात पर्यावरणावर विपरित परिणाम होऊ शकतात असे नमूद करुन गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाला तातडीने उपाययोजना हाती घेण्याचा आदेश दिला आहे.

प्रदुषित झालेल्या नद्यांचे भाग
अस्नोडा ते शिरसई (अस्नोडा नदी)
डिचोली ते कुडचिरे (डिचोली नदी)
फोंडा ते ओपा (खांडेपार नदी)
कांदोळी (सिकेरी नदी)
तेरेखोल (तेरेखोल नदी)
साखळी-डिचोली-पर्ये (वाळवंटी नदी)
कुडचडे-मडकई (जुवारी नदी)
माशेल तेवळवई ( मांडवी नदी)
काणकोण (तळपण नदी)
खारेबांद ते मोबोर (साळ नदी)

Web Title: 10 rivers of Goa polluted with Mandvi-Zuvari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.