केंद्राने गोव्याला दिले १०० कोटी; महिनाभरात डीपीआर पाठवण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 12:43 PM2023-07-14T12:43:21+5:302023-07-14T12:44:25+5:30
१०० कोटी रुपये व्याजमुक्त कर्ज केंद्र देणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : युनिटी मॉलसाठी केंद्र सरकारकडून गोव्याला १०० कोटी रुपये व्याजमुक्त कर्ज देईन, अशी ग्वाही केंद्रीय उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
एक महिन्यात सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) केंद्राला पाठवा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे उपस्थित होते. युनिटी मॉलची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातून आणली आहे. सर्व राज्यांना त्यासाठी निधी दिला जाणार आहे. राज्य सरकार लवकरच केंद्राला डीपीआर पाठवील, असे खंवटे यांनी सांगितले. १०० कोटी रुपये व्याजमुक्त कर्ज केंद्र देणार आहे. युनिटी मॉलसाठी जागा शोधण्याचे काम सुरु असल्याचे खंवटे यांनी सांगितले. एक जिल्हा, एक पदार्थ' या संकल्पनेच्या बाबतीत गोव्याच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय मंत्र्यांनी घेतला. उत्तर गोवा जिल्ह्यासाठी ओडीओपी उपक्रमांतर्गत काजूला पहिले उत्पादन तर फेणीला दुसरे उत्पादन म्हणून निवडण्यात आले आहे. दक्षिण गोवा जिल्ह्यात, फेणीला पहिले आणि काजूला दुसरे उत्पादन म्हणून निवडले आहे.
गोव्याच्या विविध प्रकारच्या हस्तकला, कला आणि सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने युनिटी मॉल सुरु केला जाईल. पर्यटकांना गोव्यातील उत्पादनांबरोबरच सर्व राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने एकाच छताखाली मिळतील. युनिटी मॉल मध्ये एक जिल्हा, एक उत्पादन' यासह स्थानिक हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध करुन दिल्या जातील, असे सांगण्यात आले...