प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गोव्यात १0५४ एलपीजी जोडण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 06:54 PM2018-12-28T18:54:09+5:302018-12-28T18:54:42+5:30
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गोव्यात १0५४ एलपीजी गॅस सिलिंडरच्या जोडण्या देण्यात आल्या असून उत्तर गोव्यात १२९ टक्के तर दक्षिण गोव्यात १२0 टक्के उद्दिष्ट साध्य झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पणजी : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गोव्यात १0५४ एलपीजी गॅस सिलिंडरच्या जोडण्या देण्यात आल्या असून उत्तर गोव्यात १२९ टक्के तर दक्षिण गोव्यात १२0 टक्के उद्दिष्ट साध्य झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. गॅस स्टोव्ह तसेच सिलिंडरसाठी पैसे नसल्याने ३८.१४ टक्के लाभार्थींना कर्ज सुविधा देण्यात आली.
पत्रकार परिषदेत हिन्दुस्तान पेट्रोेलियम कंपनीचे विभागीय साहाय्यक व्यवस्थापक (विक्री) वैभव भगत म्हणाले की, १४.२ किलोचा सिलिंडर रिफिल घेणे शक्य नसलेल्यांसाठी ५ किलोचा रिफिल देण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्तर गोव्यात सर्वाधिक ६0 टक्के गरजुंनी पेडणे तालुक्यात लाभ घेतलेला आहे त्या पाठोपाठ फोंडा तालुक्याचा क्रमांक लागतो. दक्षिण गोव्यात धारबांदोडा व काणकोण तालुक्यांमध्ये जास्त लाभार्थी आहेत.
वरील योजनेखाली उत्तर गोव्यात भारत पेट्रालियमने ३१४, हिन्दुस्तान पेट्रोलियमने ३४८ तर इंडियन आॅइल कंपनीने ८३ एलपीजी सिलिंडर दिले. दक्षिण गोव्यात भारत पेट्रालियमने ४ , हिन्दुस्तान पेट्रोलियमने २७७ तर इंडियन आॅइल कंपनीने २८ एलपीजी सिलिंडर दिले. देशभरात मार्च २0१९ पर्यंत दारिद्र्य रेषेखालील ५ गृहिणींना आणि मार्च २0२0पर्यंत अतिरिक्त ३ कोटी गृहिणींना या योजनेखाली एलपीजी जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मागास व अनुसूचित जमातींच्या लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे.
१ मे २0६ रोजी ही योजना सुरु करण्यात आली. आतापर्यंत ज्यांनी या योजनेखाली सिलिंडर घेतले त्यातील ८0 टक्के लाभार्थींनी पुन: सिलिंडर भरुनही घेतल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस भारत पेट्रोलियमचे विभागीय साहाय्यक व्यवस्थापक (विक्री) मथुरा वैद्य हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात सर्व पेट्रोलियम कंपन्यांचे मिळून दक्षिण गोव्यात २ लाख ३ हजार तर उत्तर गोव्यात २ लाख ७४ हजार ग्राहक आहेत.