शेतकऱ्यांना ११ हजार सौर पंप मोफत; शेतामध्ये २ मॅगावॅट सौर ऊर्जा निर्मितीसाठी ५0 टक्के सबसिडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 03:28 PM2021-09-12T15:28:54+5:302021-09-12T15:30:02+5:30
, राज्यात अधिकाधिक सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे.
पणजी: कृषी क्षेत्राला अधिकाधिक चालना देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना ११ हजार सौर पंप मोफत देणार आहे. सध्या असलेले इलेक्ट्रिक पंप त्यामुळे शेतकऱ्यांना बदलता येतील.
गेल्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या निर्णयबाबत वीजमंत्री निलेश काब्राल यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, राज्यात अधिकाधिक सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. शेतात २ मॅगावॅट सौर ऊर्जा निर्मितीसाठी सरकार शेतकऱ्यांना ५0 टक्के सबसिडी देऊन प्रोत्साहन देणार आहे. शेतकऱ्यांकडून या प्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात येतील. सरकार या शेतकऱ्यांकडून चांगला दर देऊन सौर ऊर्जा खरेदी करील, असे काब्राल यांनी सांगितले.काब्राल म्हणाले की, सरकार लोकांना खुल्या जागेत, घराच्या छतांवर सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
१६ लाख एलईडी बल्ब देणार-
लोकांना १६ लाख एलईडी बल्ब सरकार वितरित करणार असून त्यामुळे घराघरात विजेची बचत होईल. २0१६-१७ मध्येही असेच एलईडी बल्ब वितरित केले होते.