मडगाव पालिका इमारतीचे 115 व्या वर्षात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 06:32 PM2019-04-30T18:32:49+5:302019-04-30T18:35:40+5:30

मडगाव शहराची शान असलेल्या पालिकेच्या ऐतिहासिक इमारतीने आज आपला 114 वा स्थापना दिन साजरा केला.

The 115th year of the Margao Municipality building | मडगाव पालिका इमारतीचे 115 व्या वर्षात पदार्पण

मडगाव पालिका इमारतीचे 115 व्या वर्षात पदार्पण

googlenewsNext

मडगाव - 2 मे पासून मडगावचे उपनगर असलेल्या फातोर्डा शहरात चार दिवसांचा वारसा महोत्सव सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज 30 एप्रिल रोजी मडगावातही एका ऐतिहासिक घटनेची नोंद झाली. मडगाव शहराची शान असलेल्या पालिकेच्या ऐतिहासिक इमारतीने आज आपला 114 वा स्थापना दिन साजरा केला.
30 एप्रिल 1905 रोजी या ऐतिहासीक आणि स्थापत्य शास्त्रचा एक देखणा नमुना असलेल्या इमारतीचे उद्घाटन झाले होते. वास्तविक हा सोहळा मडगाव पालिकेने धुमधडाक्यात साजरा करण्याची गरज होती. मात्र या ऐतिहासीक घटनेचे फोटो व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर मडगावच्या नगराध्यक्षा बबिता प्रभुदेसाई यांनी केक कापून हा दिवस साजरा केला. यावेळी मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, नगरसेवक जाफर बुदानी, दामोदर नाईक आणि काही पालिका कर्मचारी उपस्थित होते.

या ऐतिहासिक इमारतीचा बुन्यादीचा चिरा 27 सप्टेंबर 1902 या दिवशी घालण्यात आला होता. ही इमारत उभारण्याचा विडा उचललेल्या कोंब मडगाव येथील एका कुमारिकेने अवघ्या अडीच वर्षात ही इमारत उभी करुन घसघशीत इनामही जोडले होते. या इमारतीचे 30 एप्रिल 1905 रोजी त्यावेळचे गव्हर्नर कर्नल एदुआदरु आगुस्तु रॉड्रीगीश गाल्हादरु यांच्या हस्ते या देखण्या इमारतीचे उद्घाटन झाले होते.

मडगावच्या शहरासंदर्भात पुस्तक लिहिलेले जुन्या काळातील पत्रकार वाल्मिकी फालेरो यांनी आपल्या पुस्तकात ही इमारत बांधल्यानंतर आणि त्यासाठी सासष्टीच्या लोकांवर जबरी कर लादल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता त्याचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, गव्हर्नर गाल्हादरु यांनी ही इमारत उभारण्यासाठी लोकांवर जे कर लादले त्यातून राय येथील आर्नाल्दु द मिनेङिास यांनी ह्यकितलें ओदृष्ट आमचेह्ण हा मांडा रचला होता. त्यावेळी या पालिकेचे क्षेत्र केवळ मडगावपुरतेच मर्यादित नव्हते तर पु:या सासष्टीत आणि आजच्या मुरगाव तालुक्यात जो पूर्वी सासष्टीचाच एक भाग होता. एवढय़ा मोठय़ा परिसरावर या पालिकेचा अंमल होता.

दरम्यान, मडगावसाठी 30 एप्रिल या दिवसाला ऐतिहासिक महत्व असून मडगाव पालिकेने हा दिवस वार्षिक उत्सव म्हणून साजरा करण्याची गरज वारसाप्रेमींनी व्यक्त केली आहे. मडगावचे विवेक नाईक यांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, मडगाव पालिकेने या ऐतिहासिक स्वरुपाच्या दिवसाचे महत्व ओळखून नवीन पिढीला मडगावच्या जुन्या इतिहासाची ओळख व्हावी यासाठी उपक्रम हाती घेण्याची मागणी व्यक्त केली. ते म्हणाले, या दिवसानिमित्त पालिकेकडून विद्यार्थी व वारसाप्रेमींसाठी ह्यहेरिटेज वॉकह्ण सारखा उपक्रम राबविता येणो शक्य आहे. मडगावातील वारसाप्रेमी लिन बरेटो यांनी आपल्या फेसबुक पेजवर या दिवसाचा उल्लेख करणारा पोस्ट टाकल्यामुळेच मडगावकरांना या दिवसाची आठवण झाली अन्यथा या ऐतिहासिक महत्वाच्या दिनाकडे दुर्लक्ष झाले असते असे ते म्हणाले.

डागडुजीचा प्रस्ताव जी सूडाकडे पडून
ऐतिहासिक महत्वाच्या पालिकेच्या या इमारतीची डागडुजी करुन तिला तिचे वारसा वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी पालिकेने जी सूडाकडे जो प्रस्ताव पाठविला होता तो मागचे वर्षभर तसाच पडून आहे. या पालिकेच्या डागडुजीबरोबरच ऐतिहासिक महत्व असलेल्या लोहिया मैदानाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्तावही जी सूडाकडे पाठविण्यात आला होता. यासाठी मडगाव पालिकेने तज्ञांची नेमणूक केली होती. या तज्ञ समितीने काही सूचनाही केल्या होत्या. या सर्व सुचनांसह हा प्रस्ताव सूडाकडे पाठवून देण्यात आला आहे अशी माहिती मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिली.
 

Web Title: The 115th year of the Margao Municipality building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा