सात पॉवरफुल मंत्र्यांच्या खात्यांना १२,५७१ कोटी; गोवा सरकारचे निम्मे बजेट ६ मंत्र्यांना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 08:36 AM2023-03-31T08:36:38+5:302023-03-31T08:37:08+5:30

सावंत मंत्रिमंडळातील सहा पॉवरफुल मंत्र्यांना अर्थसंकल्पातून तब्बल १२,२२५ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

12 571 crore to seven powerful ministers portfolios half of goa govt budget 2023 to 6 ministers | सात पॉवरफुल मंत्र्यांच्या खात्यांना १२,५७१ कोटी; गोवा सरकारचे निम्मे बजेट ६ मंत्र्यांना!

सात पॉवरफुल मंत्र्यांच्या खात्यांना १२,५७१ कोटी; गोवा सरकारचे निम्मे बजेट ६ मंत्र्यांना!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सावंत मंत्रिमंडळातील सहा पॉवरफुल मंत्र्यांना अर्थसंकल्पातून तब्बल १२,२२५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. ही रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या (२६,८४४ कोटी) रकमेच्या तुलनेत ४५.५४ टक्के एवढी आहे. याचाच अर्थ जवळजवळ निम्मे बजेट मुख्यमंत्र्यांनी या सहा मंत्र्यांनाच दिले आहे.

मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या वीज खात्याला सर्वाधिक ३८४६.३६ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापाठोपाठ तब्बल ५ खाती ज्यांच्याकडे आहेत ते मंत्री विश्वजित राणे यांचा क्रमांक लागतो. त्यांना एकूण ३,६०८ कोटी मिळाले आहेत. त्यांच्याकडील आरोग्य खात्याला २३२४.६५ कोटी, नगर विकास खात्याला ६०४.३२ कोटी, वन खात्याला १७५.६५ कोटी, तर महिला व बाल कल्याण खात्याला ५०३.९५ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

- एकूण २६,८४४ कोटींच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत प्रमाण ४५.५४ टक्के.

- सुदिन यांना सर्वाधिक ३८५६.३६ कोटी, विश्वजितना ३,६०८ कोटी रुपये

- माविन गुदिन्हो यांच्याकडील वाहतूक खात्याला २९६.७५ कोटी, पंचायत खात्याला ३५६.९५ कोटी, उद्योग खात्याला ८५.२६ कोटी मिळाले.

- मंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे तीन खाती आहेत. त्यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम खात्याला २,६८७.५४ कोटी रुपये मिळाले आहेत, तर पर्यावरण खात्याला ३९.१३ कोटींची तरतूद केली आहे.

- मंत्री गोविंद गावडे यांच्याकडील क्रीडा व युवा व्यवहार खात्याला ३८४.२४ कोटी, कला व संस्कृती खात्याला १९५.६० कोटी व ग्रामीण विकास खात्याला २२१.४६ कोटी दिले आहेत.

- मंत्री रोहन खंवटे यांच्याकडील पर्यटन खात्याला २६२.८५ कोटी व माहिती तंत्रज्ञान खात्याला २४१.१३ कोटी अर्थसंकल्पात प्राप्त झाले.

- मंत्री सुभाष फळदेसाई यांना समाज कल्याण खात्यासाठी ५०४ कोटी व नदी परिवहन खात्यासाठी १५३.१९ कोटी रुपये दिले आहेत. 

- मंत्री रवी नाईक यांना कृषी खात्यासाठी २७७.४७ कोटी व नागरी पुरवठा खात्यासाठी ८८.८१ कोटी मिळून ३६६.२८ कोटी रुपये दिले आहेत.

- मंत्री बाबूश मोन्सेरात यांना विज्ञान, तंत्रज्ञान व कचरा व्यवस्थापन खात्यासाठी २२१.१५ कोटी, मजूर व रोजगार खात्यासाठी ११५.५४ कोटी रुपये दिले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: 12 571 crore to seven powerful ministers portfolios half of goa govt budget 2023 to 6 ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.