लाईव्ह गेमिंग खेळणाऱ्या १२ जणांना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
By वासुदेव.पागी | Published: November 15, 2023 05:25 PM2023-11-15T17:25:12+5:302023-11-15T17:26:29+5:30
गोव्यात क्राईम ब्रॅंचची मोठी कारवाई.
पणजी: दोनापावला येथील चान्सीस कॅसिनोवर क्राईम ब्रँचकडून मंगळवारी रात्री छापा टाकण्यात आला. या कारवाईत बेकायदेशीररित्या लाईव्ह जुगार खेळणाऱ्या १२ जणांना अटक केली.
लाईव्ह जुगारला परवानगी नसतानाही दोनापावला येथील चान्सीस कॅसिनोवर लाईव्ह जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.तिथे जुगार खेळणाऱ्यांना आणि जुगार चालविणाऱ्यांना मिळून १२ जणांना अटक केली. तसेच कॅसिनोवरील साहित्यही जप्त केले. त्यात १टेबल, लाइव्ह कार्ड्स, कार्ड शफर, १कार्ड स्कॅनर, १डेल मोनिटर, १ डिलर मॉनिटर, ३६ लाख रुपये किंमतीची कॅश चिप फ्लोट, आणि ३३ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
गोव्यात लाईव्ह गेमिंगवर बंदी असून या बंदीचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी ऑनलाईन गेमिंग सुरू असते. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लायव्ह गेमिंगविरुद्ध कारवाई चालविली होती.