कदंबच्या धडकेने १२ वर्षीय मुलगा जखमी, बस चालकाविरोधात गुन्हा दाखल
By सूरज.नाईकपवार | Updated: April 7, 2024 11:24 IST2024-04-07T11:24:48+5:302024-04-07T11:24:57+5:30
या प्रकरणी बस चालक श्रीशैल बिरादार (३४) याच्याविरोधात गुन्हा नोंद केल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली.

कदंबच्या धडकेने १२ वर्षीय मुलगा जखमी, बस चालकाविरोधात गुन्हा दाखल
मडगाव : गोव्यातील मडगावात कदंब बसने धडक दिल्याने एक १२ वर्षीय मुलगा जखमी झाला. अभय बबलू पोरदेसी असे त्याचे नाव असून, तो मूळचा महाराष्ट्रातील सांगली येथील मिरजमधील आहे. शनिवारी कदंब बसस्थानकावर ही अपघाताची घटना घडली.
या प्रकरणी बस चालक श्रीशैल बिरादार (३४) याच्याविरोधात गुन्हा नोंद केल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली. बस चालकावर भादंसंच्या २७९ व ३३८ कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विल्टन रिबेलो पुढील तपास करीत आहेत.
अभय हा एका बसमधून खाली उतरल्यानंतर रस्ता ओलांडत होता. यावेळी अचानक त्याला बसने ठोकर दिली. त्यामुळे तो रस्त्यावर पडला व त्याचा पाय चाकखाली सापडला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.