गोव्यात पहिल्या दोन तासात १३ टक्के मतदान! महिला मतदारांचाही प्रतिसाद
By किशोर कुबल | Published: May 7, 2024 10:31 AM2024-05-07T10:31:57+5:302024-05-07T10:32:07+5:30
लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी सर्वत्र शांततेत मतदान चालू असून सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात १३.०२ टक्के मतदान झालेले आहे.
किशोर कुबल/पणजी
पणजी : लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी सर्वत्र शांततेत मतदान चालू असून सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात
१३.०२ टक्के मतदान झालेले आहे. सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. काही मतदान केंद्रावर अगदी कमी उपस्थिती दिसत होती तर काही केंद्रावर रांगा होत्या. लोकांनी सकाळीच मतदानासाठी घराबाहेर पडणे पसंत केले. महिला मतदारांचाही प्रतिसाद दिसून आला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पाळी, कोठंबी येथे ते राहत असलेल्या ठिकाणच्या मतदान केंद्रावर तर उत्तर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांपेद्र भागातील केंद्रावर सकाळी मतदानाचा हक्क बजावला. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात सरासरी १३.२४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक १६.०४ टक्के मतदान कुडचडे विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी १२ टक्के मतदान फातोर्डा विधानसभा मतदारसंघात झाले.