अरे व्वा! राज्यात 'मुद्रा' योजनेचे १३ हजार २९८ लाभार्थी, युवा वर्गाची आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 12:17 PM2023-05-01T12:17:49+5:302023-05-01T12:18:15+5:30

आतापर्यंत एकूण २३८. ३६ कोटी रुपये कर्ज वितरण 

13 thousand 298 beneficiaries of the mudra scheme in the goa | अरे व्वा! राज्यात 'मुद्रा' योजनेचे १३ हजार २९८ लाभार्थी, युवा वर्गाची आघाडी 

अरे व्वा! राज्यात 'मुद्रा' योजनेचे १३ हजार २९८ लाभार्थी, युवा वर्गाची आघाडी 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : प्रधानमंत्री मुद्रा योजनेत शिशु किशोर व तरुण अशा तीन वर्गवारीत राज्यात लाभार्थीची संख्या १३,२९८ वर पोचली आहे. या सर्व लाभार्थीच्या खात्यांवर मिळून एकूण २३८. ३६ कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले. वर्षभराच्या काळात लाभार्थीची संख्या ९५ टक्क्यांनी वाढली आहे.

नव्याने लघू उद्योग सुरु करणायांसाठी 'शिशू कर्ज' वर्गवारीत ५० हजार रुपयांपर्यंत, आधी व्यवसाय सुरु केलेला आहे अशांसाठी 'किशोर कर्ज योजनेखाली ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत व ज्यांचा व्यवसाय स्थापित झालेला आहे अशांसाठी 'तरुण कर्ज' वर्गवारीत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

२३.८१ कोटी थकीतच

याबाबत अधिकायांनी दिलेल्या माहितीनुसार शिशू वर्गवारी ६.२२ कोटी रुपये, किशोर वर्गवारीत ३२.६० कोटी व तरुण वर्गवारीत २३.८१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. बिगर उत्पादक मालमत्तेचे प्रमाण ८.८६ टक्के आहे.

किशोर लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक

वित्त विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार किशोर वर्गवारीत लाभार्थीचे प्रमाण जास्त आहे. एकूण ६४४४ लाभार्थीची खाती उघडली व त्यांना त्यांना १०८.०८ कोटी कर्ज वितरित करण्यात आले. शिशू वर्गवारीत ५.११० खाती उघडण्यात आली व त्यांना १७.४० कोटी वितरित केले. तरुण वर्गवारीत १,७४४ खाती उघडण्यात आली व त्यातून ११२.८८ कोटी रुपये वितरित केले.

गरजूंना उद्योजकांना मदतीचा उद्देश

स्वयंरोजगारासाठी गरजूंना सोप्या पध्दतीने कर्ज मिळावे व छोटे उद्योग निर्माण करणे हा उद्देश आहे. या योजनेखाली ७ वर्षांच्या कालावधीसाठी १ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी साधारणपणे ७.३० टक्के व्याज आकारले जाते. राज्यातील गरजूंना, उद्योग क्षेत्रात येवू इच्छिणाऱ्या युवा पिढीला मदतीचा उद्देश आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: 13 thousand 298 beneficiaries of the mudra scheme in the goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा