राज्यातील १३५२ रुग्ण घेतात डायलेसिसवर उपचार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 04:11 PM2024-02-08T16:11:37+5:302024-02-08T16:12:15+5:30
रुग्णांना खर्च येऊ नये यासाठी या सरकारी विविध याेजना अंतर्गत हा उपचार केला जातो.
- नारायण गावस
पणजी : राज्यात मागील काही वर्षांपासून किडनी खराब होण्याचा रुग्णांमध्ये वाढ होत असून सध्या राज्यातील विविध सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये मिळून एकूण १ हजार ३५२ रुग्ण डायलेसिसवर उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी अधिवेशनात आमदार प्रविण आर्लेकर यांनी मांडलेल्या लेखी प्रश्नाला दिली आहे.
राज्यात डायलेसिसवर अनेक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. यात लहान, युवांपासून वयस्क रुग्णांचा सहभाग आहे. यातील ६६० रुग्ण हे पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसिस प्रोग्राम या योजने अंतर्गत सरकारी हॉस्पिटलमध्ये डायलेसिस उपचार घेत आहेत. तर एकूण २०२ रुग्ण हे दिन दयाळ स्वस्थ सेवा योजना अंतर्गत सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर ५४४ रुग्ण विविध राज्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये डायलेसिसचे उपचार घेत आहेत. डायलेसिसच्या रुग्ण संख्येत सध्या वाढ हाेत चालली आहे.
बदलती जीवनशैली, बदलता आहार, कमी निद्रा तसेच बदलने हवामान शा अनेक कारणांचा सध्या आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. रुग्णांचे दोन्ही किडनी काम करु शकत नाही अशा रुग्णांना डायलेसिसवर ठेवले जाते. काही रुग्णांना आठवड्याला ३ तर काही जणांना दोन वेळा डायलेसिस केली जात आहे. रुग्णांना खर्च येऊ नये यासाठी या सरकारी विविध याेजना अंतर्गत हा उपचार केला जातो. गोवा वैद्यकीय महाविद्यालय राज्यातील जिल्हा हॉस्पिटल तसेच अन्य सामाजिक आराेग्य केंद्रामध्ये हा उपचार सुरु आहे. आरोग्य खात्याकडून वाढती रुग्ण संख्या पाहून डायलेसिसची मशिन आणखी वाढविण्याची शक्यता आहे.