१४.९ कोटींची फसवणूक; माजी मंत्री परुळेकर अडचणीत; अटकेसाठी मुंबई पोलिसांची गोव्यात शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 08:33 AM2023-11-08T08:33:55+5:302023-11-08T08:34:16+5:30

१४.९ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात माजी मंत्री परुळेकर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आला होता.

14 9 crore fraud former minister parulekar in trouble mumbai police search operation in goa for arrest | १४.९ कोटींची फसवणूक; माजी मंत्री परुळेकर अडचणीत; अटकेसाठी मुंबई पोलिसांची गोव्यात शोधमोहीम

१४.९ कोटींची फसवणूक; माजी मंत्री परुळेकर अडचणीत; अटकेसाठी मुंबई पोलिसांची गोव्यात शोधमोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मालमत्तेच्या खरेदीच्या नावाने १४.९ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी रेईश-मागूश रिअल इस्टेट कंपनीचे संचालक व माजी मंत्री सुरेश परुळेकर यांना अटक करण्यासाठी मुंबई पोलिस काल गोव्यात दाखल झाले आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते सापडले नसल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

१४.९ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात माजी मंत्री परुळेकर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आला होता. परंतु अटक चुकविण्यासाठी परुळेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई दिवाणी न्यायालयात व घेतली होती. मात्र त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला नसल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी मुंबईहून पोलिस पथक गोव्यात दाखल झाले आहे. 

परुळेकर यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीनुसार, त्यांनी जमीन खरेदी करून देण्याचे सांगून पैसे घेतले व नंतर फसवणूक केली. मुंबईस्थित प्रेमचंद गावस या प्रकरणातील तक्रारदार आहेत. ते मूळचे डिचोली येथील आहेत. गावस यांनी जानेवारी २००८ ते फेब्रुवारी २०२३ या काळात परुळेकर यांना नियमित हप्त्यांमध्ये १४.९ कोटी रुपये दिले होते. ठरावीक कालावधीत गावस यांना जमीन मिळवून देणे हे परुळेकर यांच्या कंपनीची जबाबदारी होती. परंतु त्यांनी जमीन उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक केल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.

परुळेकर यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा असे तिघेही या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे तिघेही कायद्याच्या कात्रीत सापडले असून, तिघांनाही मुंबई पोलिस अटक करून घेऊन जाऊ शकतात.

घरांना टाळे

पथकाने रेईश-मागूश, आगशी तसेच जुवे गोवे परिसरात परुळेकर व कुटुंबीयांचा शोध घेतला. पण ते सापडले नाहीत. पर्वरी पोलिसांच्या सहकार्याने आंबोखाण-बेती येथील परुळेकरच्या घरी गेले मात्र घराला टाळे असल्याची माहिती पर्वरीचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिली.

 

Web Title: 14 9 crore fraud former minister parulekar in trouble mumbai police search operation in goa for arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा