केपे भागात १६ गायींचा आकस्मिक मृत्यू
By Admin | Published: June 16, 2017 02:07 AM2017-06-16T02:07:05+5:302017-06-16T02:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कसावर्डे : केपे भागातील ताक-अणे येथे बुधवारी सायंकाळी १६ गायी व वासरांच्या आकस्मिक मृत्यूने या भागात एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावर्डे : केपे भागातील ताक-अणे येथे बुधवारी सायंकाळी १६ गायी व वासरांच्या आकस्मिक मृत्यूने या भागात एकच खळबळ उडाली. या गायींवर विषप्रयोग करून घातपात घडवून आणला की त्यांना कुठल्या तरी वनस्पती खाल्ल्याने विषबाधा झाली याची चौकशी केपे पोलीस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी अणे-ताक येथे गायी मृत्युमुखी पडल्याचे त्यांना कळविण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता १६ गायी मृत्युमुखी पडलेल्या दिसल्या. त्यानंतर राहुल देसाई यांनी लेखी तक्रार दिली. पोलिसांनी पंचनामा केला. तसेच पशुसंवर्धन खात्याचे डॉ. रानी यांनी या गायींचे अवयव काढून पुढील तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर गायींना पुरण्यात आल्याची माहिती हवालदार संतोष गावकर यांनी दिली. पुढील तपास निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गावकर करीत आहेत.