घरी जाण्याच्या वाटेवर मृत्यूने गाठलं, अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By पंकज शेट्ये | Published: July 27, 2024 03:18 PM2024-07-27T15:18:03+5:302024-07-27T15:26:56+5:30

वास्को: भरधाव वेगाने चारचाकी चालवत घरी जाताना जुलीयस फर्नांडीस नामक १८ वर्षीय युवकाचा चारचाकीवरील ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात ...

18-year-old dies in an accident in Vasco | घरी जाण्याच्या वाटेवर मृत्यूने गाठलं, अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

घरी जाण्याच्या वाटेवर मृत्यूने गाठलं, अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वास्को: भरधाव वेगाने चारचाकी चालवत घरी जाताना जुलीयस फर्नांडीस नामक १८ वर्षीय युवकाचा चारचाकीवरील ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात तो जागीच ठार झाला. देवोती - लोटली येथे राहणारा जुलीयस वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील रस्त्यावरील उतरणी काढताना त्याचा चारचाकीवरून ताबा सुटून चारचाकी रस्त्याबाहेर असलेल्या झुडपी भागात झाडावर धडकली. त्या अपघातात चारचाकीचा चक्काचूर होऊन जुलीयस ठार झाल्याची माहीती वेर्णा पोलिसांकडून मिळाली.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.२७) रात्री दोन वाजता तो भीषण अपघात घडला. १८ वर्षीय जुलीयस चारचाकीने (क्र: जीए ०१ एस ९८५८) एकटाच लोटली येथे त्याच्या घरी जाण्यासाठी प्रवास करीत होता. जेव्हा तो वेर्णा औद्योगिक वसाहतीतील लोटली येथे जाणाऱ्या जुन्या रस्त्याच्या उतरणीवर पोचला त्यावेळी अचानक त्याचा चारचाकीच्या ‘स्टीअरींग’ वरील ताबा सुटला. ताबा सुटल्याने भरधाव वेगाने असलेली चारचाकी रस्त्या बाहेरील झुडपी भागात पोचून चारचाकीने तेथे असलेल्या झाडाला जबर धडक दिली. तो अपघात एवढा भीषण होता की चारचाकीचा चक्काचूर होण्याबरोबरच जुलीयस जागीच ठार झाल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.

अपघाताची माहीती मिळताच पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर जाऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच मयत जुलीयस च्या मृतदेहावर पंचनामा करून मृतदेह शवगृहात ठेवला. शनिवारी जुलीयसच्या मृतदेहावर शवचिकीत्सा केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. वेर्णा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 18-year-old dies in an accident in Vasco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.