गोव्यात महिलांसाठी १८१ सेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 08:40 PM2018-09-10T20:40:38+5:302018-09-10T20:40:56+5:30

स्त्रियांना धोकादायक परिस्थितीत व आणीबाणीप्रसंगी सहाय्य देण्याच्या हेतूने सरकारने ‘जीव्हीके ईएमआरआय’मार्फत १८१ ही चोवीस तास महिलांसाठी हेल्पलाईन सेवा सुरुवात केली आहे.

181 service for women in Goa | गोव्यात महिलांसाठी १८१ सेवा सुरु

गोव्यात महिलांसाठी १८१ सेवा सुरु

googlenewsNext

पणजी - स्त्रियांना धोकादायक परिस्थितीत व आणीबाणीप्रसंगी सहाय्य देण्याच्या हेतूने सरकारने ‘जीव्हीके ईएमआरआय’मार्फत १८१ ही चोवीस तास महिलांसाठी हेल्पलाईन सेवा सुरुवात केली आहे. पणजीतील कला अकादमीच्या आवारात या सेवेचा लोकार्पण सोहळा झाला. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी १८१ या वाहनसेवेला बावटा दाखविला. 

या वेळी आरोग्य खात्याचे संचालक संजीव दळवी, महिला व बाल विकास संचालनालयाचे संचालक दिपक देसाई, महिला व बाल विकास संचालनालयाच्या सहाय्यक संचालक दिपाली नाईक, गोवा विद्यापीठाच्या महिला विभागाच्या प्रमुख शैला डिसोझा, गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक, १०८ जीव्हेकेचे संचालक कृष्णमराजू, डॉ. शिवानंद बांदेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्यात सरकराकडून १०८रुग्णवाहिका ही मोफत सेवा जीव्हीके ईएमआरआयद्वारे संचालित केली जाते. आतापर्यंत ३१ हजार लोकांना जिवदान देणाºया या १०८ रुग्णवाहिकेला १० वर्षे पूर्ण झाले असून सरकारने १०८ जीव्हीके ईएमआरआयसोबत पुढील १० वर्षांसाठी पुन्हा या करारचे नूतनीकरण केले.

१८१ सेवेचे स्वरुप...

१) सरकारकडून चोवीस तास कार्यरत १८१ ही टोल फ्री हेल्पलाईन सेवा महिलांसाठी चालू. सेवा मोबाईल किंवा लँडलाइनद्वारे वापरली जाऊ शकते. सेवा महिलांना कौटुंबिक हिंसा, मार्गदर्शन, माहिती व इतर धोक्याच्या घटनांमध्ये मदत करेल. महिलांना सक्षमीकरण आणि अधिकारांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यात मदत.

२) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हस्तक्षेपाद्वारे संकटकालीन समुपदेशन, भावनिक आधार आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचाव पथक तैनात केले आहे. हेल्पलाईन क्रमांक रुग्णवाहिका (१०८) आणि पोलिस (१००) यांच्या समन्वयाने काम करेल. सेवेव्दारे महिला करियर व अन्य समस्यांबाबत सल्लाही घेऊ शकतात. आवश्यकतेनुसार, महिलांना आसगाव येथील गोमंतक लोकसेवा ट्स्ट महिलाआश्रममध्ये पाठविले जाईल. यासाठी बचाव वाहन उपलब्ध केल्या आहेत. ही सेवा १७ सप्टेंबरपासून पूर्णत: कार्यशील होईल. 

विश्वजित राणे काय म्हणाले...

१८१ या हेल्पलाईनविषयी मंत्री विश्वजित राणे म्हणाले, महिलांवर अत्याचार वाढल्याने या सेवेची अत्यंत गरज होती. ही सेवा महिलांसाठी आधारस्तंभ ठरेल. तक्रार करणाºया महिलांची ओळख उघड केली जाणार नाही. त्यामुळे महिलांनी भीती न बाळगता आवश्यकतेनुसार या सेवेचा लाभ घ्यावा. 

Web Title: 181 service for women in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.