पेडणे-आगरवाडा येथे एटीएम फोडून पळवले १८.३० लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 08:12 PM2017-09-08T20:12:09+5:302017-09-08T20:12:21+5:30
एटीएम मशीन पळवून नेऊन ते फोडण्याचा प्रकार उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात घडला आहे. भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) पेडणे-आगरवाडा येथील भरवस्तीतील आणि मुख्य रस्त्यावर बसवलेले एटीएम मशीन दोन चोरट्यांनी रिक्षात घालून डोंगरमाथ्यावर नेवून फोडून त्यातील १८ लाख ३० हजार रुपये पळवण्याची घटना ८ रोजी पेडणे पोलीस कक्षेत घडली.
पेडणे, दि. 8 - एटीएम मशीन पळवून नेऊन ते फोडण्याचा प्रकार उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात घडला आहे. भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) पेडणे-आगरवाडा येथील भरवस्तीतील आणि मुख्य रस्त्यावर बसवलेले एटीएम मशीन दोन चोरट्यांनी रिक्षात घालून डोंगरमाथ्यावर नेवून फोडून त्यातील १८ लाख ३० हजार रुपये पळवण्याची घटना ८ रोजी पेडणे पोलीस कक्षेत घडली. मागील महिन्या भरात गोव्यात घडलेला हा दुसरा प्रकार आहे.
आगरवाडा येथील मुख्य रस्त्यावर एसबीआयचे एटीएम होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन चोरटे दुचाकी वाहनातून आले असावेत त्यांनी अगोदर पार्से येथे रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेली जीए ११ टी १४४८ ही रिक्षा चोरट्याने डायरेक्ट चावी नसताना स्टार्ट केली, त्यात मशीन घातले. हे मशीन केवळ दोन लोखंडी हूकवर बसवले होते. चोरट्यांनी लोखंडी सळीचा वापर करून हे मशीन हटवले आणि रिक्षात घातले. चोरट्यांनी रिक्षातून हे मशीन बोडकेधेनू डोंगर माळावर ज्या चिरे खाणी होत्या त्या ठिकाणी नेले. भले मोठे मशीनवर दगड घालून ते फोडण्यात आले आणि त्यातील पैसे पळवले रिक्षा नंतर मुख्य रस्त्यावर आणून ठेवली आणि ते आपल्या दुचाकीवरून पळून गेले. या एटीएमकडे सुरक्षा रक्षकाची नेमणूक न केल्याने चोरट्यांचे आयतेच फावले.
पोलिसाना सीसीटीव्हीद्वारे फुटेज मिळालेली आहे. त्यामुळे चोरटे सापडण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर, पोलीस अधीक्षक महेश गावकर, पेडणे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक अनंत गावकर यांनी लागलीच उपस्थिती लावली. पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चोरीचा गुन्हा नोंदवला.
पार्से येथील ज्या मालकाची रिक्षा चोरण्यात आली होती त्याने सकाळी उठून पाहिले तर आपली रिक्षा जाग्यावर नाही सैरभैर होऊन त्यांनी तिचा शोध घेतला. त्याचवेळी पोलीस आगरवाडा दिशेने जात होते त्याने पाठलाग करून तो रिक्षा मालक चोरी झालेल्या एटीएमकडे पोचले व आपली रिक्षा चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. कुणीतरी त्याला सांगितले की तुझी रिक्षा बोडकेधेनू रस्त्याकडे असल्याची माहिती दिली. तिथे पोलीसही गेले. सदरच्या ठिकाणी डोंगराळ भागात मशीन सापडले. तत्पूर्वी श्वानपथक घटनास्थळी व ठसेतज्ज्ञ आपले काम करीत होते.
आगरवाडा किंवा इतर ठिकाणी जी एटीएम कार्यालये असतात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केलेले नसतात. पेडणे तालुक्यात ही प्रथमच एवढी मोठी चोरी होण्याची घटना घडलेले आहे त्यामुळे जनता भयभीत झाली. चोरट्यांनी चोरी करताना बरीच प्रगती करून घटनास्थळी मशीन फोडण्या पेक्षा ती उभारून दूर ठिकाणी फोडणे शक्कल लढवलेली आहे. त्यामुळे पेडणे पोलिसांची या चोरीने झोप उडवली. घटनास्थळीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षकाना यावे लागते. बँक आणि एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे कोणत्याही सुरक्षा नसल्याने हा प्रकार घडलेला आहे.
पोलीस निरीक्षक उत्तम राऊत यांनी प्रतिक्रिया देताना पोलिसाना फुटेज मिळालेली आहे. त्यातून चोरांचा तपास लावला जातील असे ते म्हणाले. चोरटे जर बुरखे घालून आले तर चोरीचा तपास लावणे कठीण आहे. आॅगस्ट महिन्यात फोंडा तालुक्यातून एटीएम मशीन चोरुन नेण्याचा व नंतर ते पाण्यात टाकून देण्याचा प्रकार घडला होता.