सत्तरीतील सर्वात स्वच्छ गावाला मिळणार २ लाखांचा पुरस्कार
By पूजा प्रभूगावकर | Published: October 18, 2023 01:29 PM2023-10-18T13:29:16+5:302023-10-18T13:30:00+5:30
स्वच्छता ही सेवा अंतर्गत वन मंत्री विश्वजित राणे व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी स्वच्छतेची संस्कृती रुजवण्यासाठी उपक्रमाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पणजी : स्वच्छता ही सेवा अंतर्गत सत्तरी तालुक्यातील सर्वात स्वच्छ गावांना पुरस्कार दिला जाणार आहे. यात पहिल्या क्रमांकाच्या गावाला २ लाखांचे बक्षिस दिले जाईल.
स्वच्छता ही सेवा अंतर्गत वन मंत्री विश्वजित राणे व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी स्वच्छतेची संस्कृती रुजवण्यासाठी उपक्रमाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सत्तरी तालुक्यांतील गावांना स्व्छतेसाठी पुरस्कार दिला आहे. यात एकूण तीन पुरस्कार असतील. पहिला पुरस्कार २ लाखांचा, दुसरा पुरस्कार १ लाखांचा तर तिसरा पुरस्कार ७५ हजारांचा असेल.
या पुरस्कारांची घोषणा १ ऑक्टोबर रोजी केली जाईल. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण च्या निकषांच्या आधारे जसे कचरा व्यवस्थापन, घोषणा स्वच्छ आणि द्रव कचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, हागणमुक्त आदींच्या आधारे हा पुरस्कार गावांना दिला जाईल.या योजनेचे मुल्यमापन एका विशेष समितीच्या मार्गदर्शनाखाली होईल. त्यानंतर दर तीन महिन्यांनी हा उपक्रम राबवला जाईल.