तीन दिवसांच्या संततधारेनंतरही २० टक्के तूट
By Admin | Published: August 13, 2015 02:00 AM2015-08-13T02:00:13+5:302015-08-13T02:01:52+5:30
पणजी : तीन दिवस सतत पाऊस पडल्यानंतरही मोसमी पावसाची एकूण तूट २० टक्के कायम राहिली आहे. सातत्याने मुसळधार पाऊस पडला
पणजी : तीन दिवस सतत पाऊस पडल्यानंतरही मोसमी पावसाची एकूण तूट २० टक्के कायम राहिली आहे. सातत्याने मुसळधार पाऊस पडला, तरच ही तूट काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
गोव्यात सरासरी पाऊस ७१ इंचांच्या आसपास पोहोचला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ११ आॅगस्टपर्यंत सामान्य मान्सून ९१ टक्के एवढा असायला हवा होता. त्यामुळे २० टक्के घट राहिली आहे. मागील तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला; परंतु त्यामुळे एकूण पावसात मोठा फरक पडलेला नाही. केवळ सांगे ९२ इंच, वाळपई ९१ इंच, फोंडा ८५ इंच, तर पणजीत ७४ इंच पावसाची नोंद झाली आहे.
पेडणे तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे केवळ ५६ इंच पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांतही राज्यात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे भाकित हवामान खात्याने केले आहे. (प्रतिनिधी)