इफ्फीत यंदा २०० चित्रपटांचे प्रदर्शन: ‘कॅचिंग डस्ट’डस्ट पाहण्यासाठी प्रतिनिधींनी केली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 04:32 PM2023-11-20T16:32:38+5:302023-11-20T16:34:38+5:30
प्रतिनिधीनी ऑनलाईन पद्धतीने टीकीट बुक करुन हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली.
नारायण गावस, पणजी: आजपासून सुरु झालेल्या आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात देशी विदेशी कलाकर तसेच प्रतिनिधी इफ्फीच्या उद्घाटनाला दाखल झाले आहे. ताळगाव येथील श्यामाप्रसात सभागृहात सायं. ५ इफ्फीचे भव्य दिव्य अशा पद्धतीने उद्घाटन होणार आहे. द कॅचिंग डस्ट या चित्रपट पाहण्यासाठी प्रतिनधींनी आयनोक्समध्ये रांगा लावल्या होत्या. प्रतिनिधीनी ऑनलाईन पद्धतीने टीकीट बुक करुन हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली.
या महोत्सवात २०० चित्रपटांचे प्रर्दशन
आजपासून २८ नोव्हेंपर्यत इफ्फीत दोनशे चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. महोत्सवासाठी सुमारे ३००० चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील एकंदर २०० चित्रपट निवडण्यात आले असून त्यात एकूण १०३ आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मायकल डगलस यांना प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार याच महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे. प्रदर्शन होणार आहे. यंदा प्रथमच १३ चित्रपटांचे जागतिक प्रिमियर शो महोत्सवात आखण्यात आले आहेत.
सायं. हाणाऱ्या उद्घाटनाला केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. ई श्रीधरन पिल्लाई, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच खास उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता शाहीद कपूर, श्रीया सरन व इतर अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून रंग भरणार आहेत.