बायंगिणीत 200 टन कचरा प्रकल्प, पाच आमदारांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 09:46 PM2019-07-18T21:46:10+5:302019-07-18T21:46:39+5:30

सरकारने कचरा व्यवस्थान खाते स्थापन केल्यानंतर या खात्याची बायंगिणीसाठी पहिली बैठक मंत्री मायकल लोबो यांनी गुरुवारी घेतली.

200 tonnes of garbage in Varanasi, 5 MLAs decided | बायंगिणीत 200 टन कचरा प्रकल्प, पाच आमदारांचा निर्धार

बायंगिणीत 200 टन कचरा प्रकल्प, पाच आमदारांचा निर्धार

googlenewsNext

पणजी : बायंगिणी येथे नवा 200 टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प होईलच, असे सरकारने गुरुवारी तिसवाडीतील पाच आमदारांची बैठक घेतल्यानंतर जाहीर केले. पाचही आमदारांनी बायंगिणीच्या नियोजित प्रकल्पाला पाठींबा दिला आहे. येत्या 28 रोजी जाहीर सुनावणी होणार असून त्यावेळी काही आमदार उपस्थित राहतील.

सरकारने कचरा व्यवस्थान खाते स्थापन केल्यानंतर या खात्याची बायंगिणीसाठी पहिली बैठक मंत्री मायकल लोबो यांनी गुरुवारी घेतली. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, पणजीचे बाबूश मोन्सेरात, सांताक्रुझचे टोनी फर्नाडिस, सांतआंद्रेचे फ्रान्सिस सिल्वेरा आदींनी बैठकीत भाग घेतला.
बायंगिणीला प्रकल्प व्हायला हवा हा मुद्दा तिसवाडीतील सर्व आमदारांना पटला आहे. आम्ही जलदगतीने हा प्रकल्प उभा करू. जुनेगोवेचे काहीजण या प्रकल्पाला आक्षेप घेत होते, त्यांना कळंगुट-साळगावच्या पठारावरील प्रकल्प कसा चालतो ते नेऊन दाखविले गेले. त्यामुळे त्यांनाही विषय पटला, असे लोबो यांनी सांगितले. साळगावचा आधुनिक प्रकल्प हे आदर्श उदाहरण आहे, साळगावचा प्रकल्प यशस्वी ठरल्यानेच त्याची क्षमता 250 टनार्पयत वाढविली जाईल. प्रत्येकजण आज आपला कचरा साळगावच्या प्रकल्पात न्या असे सांगतो, असे लोबो म्हणाले.

मडकईकर व इतरांनी बायंगिणीच्या प्रकल्पाला आता पाठींबा दिला आहे. कारण तिसवाडीसाठी स्वतंत्र प्रकल्प हवाच. येत्या 28 रोजी होणा:या सार्वजनिक सुनावणीला आमदार उपस्थित राहून पाठींबा देऊ शकतात, असे लोबो यांनी स्पष्ट केले. पिसुर्ले- सत्तरी येथे वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा केला जाईल. दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा तिथे उपलब्ध आहे. वेर्णा येथेही एका प्रकल्पासाठी आयडीसी कचरा व्यवस्थापन खात्याकडे जागा सुपूर्द करील, असे लोबो यांनी सांगितले. स्वतंत्र खाते निर्माण झाल्यानंतर आता कचराप्रश्नी उपाय काढण्यासाठी रोज चर्चा होऊ लागली आहे असेही लोबो म्हणाले.
 

Web Title: 200 tonnes of garbage in Varanasi, 5 MLAs decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.