अनुवांशिक रोगांसाठी २ हजार शिशुंच्या चाचण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 04:38 PM2018-10-29T16:38:36+5:302018-10-29T16:38:48+5:30
संभाव्य अनुवांशिक व पचनक्रियेशी संबंधित रोगांचे निदान करणा-या नवजात शिशुंच्या चाचण्या गोमेकॉत पुन्हा स ुरू केल्यापासून आतापर्यंत २ हजार नवजात अर्भकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
पणजी - संभाव्य अनुवांशिक व पचनक्रियेशी संबंधित रोगांचे निदान करणा-या नवजात शिशुंच्या चाचण्या गोमेकॉत पुन्हा स ुरू केल्यापासून आतापर्यंत २ हजार नवजात अर्भकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या तीन महिन्यात दोन हजार नवजात अर्भकांची रस्तचाचणी घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. बंगळूरस्थीत निओ जन लॅब या संस्थेकडून या चाचण्या केल्या जात आहेत. गोमेकॉत जन्माला आलेल्या अर्भकांच्या रक्ताचे नमुने गोळा करून ते बंगळूरला पाठविले जातात. नमुने घेऊन पाठविण्याचे कामही या संस्थेचे कर्मचारीच करीत आहेत. चाचणी अहवाल हे बंगळूरहून पाठविले जातील. पैकी अनेक चाचणी अहवाल मिळालेही आहेत.
नवजात अर्भकांचे रक्ताचे नमुने काढून घेऊन त्याची अनेक प्रकारच्या चाचण्या घेण्यात येतात. बहुतेक चाचण्या या मज्जा व पचन संस्थेसंबंधी असतात. एखाद्या अर्भकात कोणताही दोष आढळल्यास त्यावर त्वरित उपचार करणे सोपे होईल या उद्देशाने ही सुविधा देण्यात आली आहे. यापूर्वीही विश्वजित राणे आरोग्यमंत्री असताना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याच संस्थेशी सरकारने करार केला होता. भाजप सरकारच्या काळात लक्ष्मीकांत पार्सेकर आरोग्यमंत्री असताना ही सुविदा बंद करण्यात आली होती. ही सुविधा फार खर्चिक आहे आणि चाचणीतून अगधीच नगण्य अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत असा दावा त्यावेळी सरकारकडून करण्यात आला होता. परंतु राणे पुन्हा आरोग्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा त्याच संस्थेशी करार करून चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या.