पालिकांसाठी २.३७ लाख मतदार
By admin | Published: September 23, 2015 01:33 AM2015-09-23T01:33:24+5:302015-09-23T01:33:35+5:30
पणजी : राज्यातील अकरा पालिका क्षेत्रांमध्ये एकूण २ लाख ३७ हजार १८२ व्यक्तींना या वेळच्या पालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क प्राप्त झाल्याचे राज्य
पणजी : राज्यातील अकरा पालिका क्षेत्रांमध्ये एकूण २ लाख ३७ हजार १८२ व्यक्तींना या वेळच्या पालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क प्राप्त झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केले आहे. येत्या शुक्रवारी महिन्याभराच्या कालावधीसाठी अकराही पालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक आचारसंहिता
लागू होणार आहे. आयोगाने तसा आदेशही
जारी केला आहे.
म्हापसा, डिचोली, पेडणे, सत्तरी, काणकोण, सांगे, मुरगाव, केपे, कुडचडे-काकोडा, मडगाव व कुंकळ्ळी या पालिकांच्या निवडणुका येत्या २५ आॅक्टोबर रोजी होत आहेत. त्यासाठी दि. २५ सप्टेंबरपासून फक्त अकरा पालिका क्षेत्रांमध्येच आचासंहिता लागू होईल व दि. २८ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही आचारसंहिता कायम असेल, असे राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सर यांनी आदेशात म्हटले आहे.
कोणत्या पालिका क्षेत्रात किती मतदारसंख्या आहे, हे मंगळवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले. सर्वाधिक मतदारसंख्या मुरगाव पालिका क्षेत्रात आहे. त्यानंतर मडगाव पालिकेचा क्रमांक लागतो. तिसरा क्रमांक म्हापसा पालिकेचा लागतो. (खास प्रतिनिधी)