२४ तासात वास्कोत २५ झाडं कोसळली; सहा चारचाकी वाहनांचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 07:17 PM2019-10-25T19:17:43+5:302019-10-25T19:18:45+5:30
काही झाडं घरावर कोसळल्यानं आर्थिक नुकसान
वास्को: गोव्यात काही दिवसापासून सतत पडत असलेल्या मूसळधार पावस व वादळी वाऱ्यामुळे मागच्या २४ तासात वास्कोतील विविध भागात २५ झाडे कोसळलेली असून यामुळे ६ वाहनांची तसेच काही घरांची बरीच नुकसानी झाली आहे. शुक्रवारी (दि.२५) पहाटे वास्को शहरात असलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या समोरील दोन भलीमोठी झाडे कोसळल्याने येथे पार्क करून ठेवलेल्या काही चारचाकी वाहनांची मोठी नुकसानी झालेली आहे. झाडांच्या पडझडीमुळे अनेक ठिकाण्यावरील वीज वाहिन्या तुटल्याने वास्कोतील काही भागात गुरूवारी रात्रीपासून तर काही जणांना शुक्रवारी सकाळपासून वीज पुरवठा खंडीत झाल्याने याचा बराच त्रास सोसावा लागला.
गोव्यात मागच्या तीन दिवसापासून पुन्हा मूसळधार पावस तसेच वादळी वारे सुरू झाल्याने वास्कोतील नागरीकांचे जनजीवन सध्या मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मागच्या २४ तासात वास्कोतील विविध भागात असलेली भलीमोठी झाडे रस्त्यावर, वीजवाहीनीवर, काही जणांच्या घरावर तसेच उभ्या करून ठेवलेल्या चारचाकी वाहनांवर कोसळल्याने बरीच नुकसानी झाल्याची माहीती वास्को अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. गुरूवारी मध्यरात्री मुरगाव नगरपालिका इमारतीसमोर असलेले भलेमोठे झाड कोसळून पालिका इमारतीवर कलंडले असून ह्या झाडाचा काही भाग खाली उभ्या करून ठेवलेल्या चारचाकीवर कोसळल्याने ह्या वाहनांची बरीच नुकसानी झाली आहे. ही घटना घडल्याच्या काही तासानंतरच शुक्रवारी पहाटे येथेच असलेल्या साईबाबा मंदिराजवळील अन्य एक भलेमोठे झाड कोसळून खाली उभ्या करून ठेवलेल्या संजय मांदे्रकर व अनंत मांर्देकर ह्या भावांच्या दोन टॅक्सी चारचाकीवर कोसळल्याने त्यांच्या वाहनांची बरीच नुकसानी झाली. ही झाडे कोसळताना येथे असलेल्या वीज खांब्यावरील वाहीनी खाली घेऊन आल्याने गुरूवारी उशिरा रात्रीपासून सदर भागात वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या निर्माण झाल्यानंतर शुक्रवारी दुपा पर्यंत ह्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागले.
मागच्या २४ तासात वास्को व जवळपासच्या भागात २५ झाडे कोसळलेली असल्याची माहीती वास्को अग्निशामक दलाचे प्रमुख फ्रांन्सिस्को मेंडीस यांनी दिली. सदर झाडे दाबोळी, चिखली, मंगोरहील, सडा, बायणा, खोलांत समुद्र किनाºयावर अशा विविध भागात कोसळलेली असल्याचे मेंडीस यांनी माहीतीत सांगितले. कोसळण्यात आलेल्या ह्या झाडापैंकी काही घरांवर, सहा वाहनांवर कोसळल्याने बºयाच प्रमाणात आर्थिक नुकसानी झाली आहे. सुदैवाने सदर घटनेत कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झालेली नसल्याची माहीती अग्निशामक दलाचे अधिकारी मेंडीस यांनी पुढे दिली. विविध ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने शुक्रवारी सकाळपासून काही भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे याप्रसंगी दिसून आले. याबरोबरच वास्कोतील विविध भागात पाणी साचणे इत्यादी प्रकारांची सदर मूसळधार पावसामुळे समस्या निर्माण झाल्याचे मागच्या २४ तासात दिसून आले. सडा तसेच अन्य काही भागात दरड कोसळण्याच्या किरकोळ घटना घडल्याची माहीती सूत्रांकडून उपलब्ध झाली.
दरम्यान गुरूवारी (दि.२४) वास्कोतील विविध ठीकाणी कोसळलेली झाडे कापण्याचे काम करण्यात येत असताना वास्को अग्निशामक दलातील दोन जवानांना जखमी होण्याची पाळी निर्माण झाली. जखमी झालेल्या ह्या जवानांची नावे सेड्रीक व मेघनाथ अशी असल्याची माहीती वास्को अग्निशामक दलाचे प्रमुख फ्रांन्सिस्को मेंडीस यांनी देऊन त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. सेड्रीक याच्या हाताला गंभीर जखम झालेली असून झाड कापण्याचे यंत्र मेघनाथ याच्या पायावर पडल्याने त्याच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. सुदैवाने सदर यंत्र पडताना ते बंद असल्याने पुढचा अनर्थ टळला. दोन्ही जखमींना इस्पितळात उपचार करून नंतर घरी पाठवण्यात आले. वास्को व जवळपासच्या विविध भागात कोसळलेली झाडे कापून येथे विविध प्रकारची निर्माण झालेली असुविधा अग्निशामक दलाचे जवान दूर करण्यासाठी व्यस्थ असल्याचे दिसून आले.
समुद्र खवळल्याने सुरक्षेच्या दृष्टीने दुसऱ्या राज्यातील ५०० मासेमारी ट्रेलर्सनी गोव्यातील वास्को, खारीवाडा समुद्रात घेतला आश्रय
मूसळधार पावस व वादळी वाºयामुळे समुद्रातील वातावरण सध्या एकदम खराब झालेले असून ह्या मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याची चेतावणी सुद्धा देण्यात आलेली आहे. भारतातील विविध राज्यातील मासेमारी ट्रोलर मागील काही दिवसापूर्वी खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर समुद्रातील वातावरण खराब झाल्याने त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने गोव्यातील वास्को, खारीवाडा समुद्र किनाऱ्यावर आश्रय घेण्यास सुरवात केली आहे. गुरूवार (दि.२४) पासून समुद्रातील वातावरण जास्त प्रमाणात खवळण्यास सुरू झाल्यानंतर गुजरात, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक अशा विविध राज्यातील मासेमारी ट्रोलरांनी खारीवाडा समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टीने आश्रय घेण्यास सुरवात केली. शुक्रवारी दुपारपर्यंत अशा विविध राज्यातील ५०० मासेमारी ट्रोलरांनी खारीवाडा समुद्रात आश्रय घेतला असून सदर मासेमारी ट्रोलरावर सुमारे सात हजार कामगार असल्याची माहीती सूत्रांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने विविध राज्यातून आश्रय घेण्यासाठी खारीवाडा समुद्रात आलेल्या ह्या ट्रोलरवरील कामगारांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी देऊन गरज भागल्यास त्यांना अन्य विविध प्रकारचा मदतीचा हात देण्यात येणार असल्याचे वास्कोतील मासेमारी व्यवसायातिल सूत्रांनी कळविले. वास्को खारीवाडा समुद्रात सदर मासेमारी ट्रोलर सुरक्षेच्या दृष्टीने सध्या त्यांचे ट्रोलर नांगरून समुद्रातील वातावरण शांत कधी होणार याची प्रतिक्षा पाहत असून वातावरण शांत झाल्यानंतर ते आपल्या राज्यात जाण्यासाठी येथून निघणार आहेत