अडीच वर्षांत गोव्यात तब्बल 262 विदेशी गुन्हेगार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 06:41 PM2019-07-03T18:41:00+5:302019-07-03T18:41:07+5:30
अंमलीपदार्थ व एटीएममधून पैसे चोरण्याच्या घटनात गोव्यात येणा-या विदेशी नागरिकांचा हात मोठय़ा प्रमाणावर असल्याचे दिसून आले आहे.
मडगाव: अंमलीपदार्थ व एटीएममधून पैसे चोरण्याच्या घटनात गोव्यात येणा-या विदेशी नागरिकांचा हात मोठय़ा प्रमाणावर असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीप्रमाणो मागच्या अडीच वर्षात तब्बल 262 विदेशी नागरीक गोव्यात गुन्हेगारीशी संबंधित असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, बहुतेक विदेशी नागरिकांवर अंमली पदार्थाच्या व्यवसायात सामील असल्याचे गुन्हे नोंद असून काही जणांवर वेश्या व्यवसायातही सहभागी असल्याचे गुन्हे नोंद झाले आहेत. गोव्यात येणा-या विदेशी पर्यटकावर मोठय़ा प्रमाणावर अत्याचार होतात असे जरी चित्र उभे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मागच्या अडीच वर्षात गुन्ह्य़ातील पीडित असलेल्या विदेशी नागरिकांची संख्या केवळ 40 आहे. त्या उलट गुन्हेगारीत समावेश असलेल्या विदेशी नागरिकांची संख्या 262 एवढी आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गोव्यात गुन्हेगारी प्रकरणात अटक केलेल्या विदेशी नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नायजेरियनांचा समावेश असून त्या पाठोपाठ तांझानियन आणि रशियनांचा समावेश आहे. यातील नायजेरियन व रशियन हे मुख्यत: अंमलीपदार्थ व्यवहार आणि वेश्या व्यवसाय अशा गुन्हय़ात सामील आहेत तर रोमानियन नागरीक एटीएम चो:यात अधिक सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय गोव्यात तांझानियन मोठय़ा प्रमाणावर बेकायदा वास्तव करुन राहिल्याचेही उघड झाले आहे. दरवर्षी गोव्यात सात लाखांच्या आसपास विदेशी नागरीक गोव्यात येत असतात. यातील 90 टक्के विदेशी नागरिक पर्यटक म्हणून गोव्यात येत असतात. मात्र त्यातील कित्येक बेकायदेशीररित्या गोव्यातच वास्तव करून राहतात.
आतापर्यंत गोव्यात अटक केलेल्या नागरिकांमध्ये इराण, युके, इज्रायल, केनिया, रशिया, घाना, तांझानिया, जर्मनी, नायजेरिया, स्वीडन, युगांडा, नेपाळ, जॉर्जिया, इटली,चेकोस्लोव्हाकिया, रोमानिया, अफगाणिस्तान, फ्रान्स, जॉर्डन, ऑसिया, टर्की, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, येमेन व आयवरी कोस्ट येथील नागरिकांचा समावेश आहे. चालू 2019 वर्षी आतार्पयत 66 विदेशी नागरिकांना गुन्हेगारी प्रक़रणात अटक करण्यात आली असून 2017 साली हे प्रमाण 70 होते. 2018 साली तो आकडा 126 र्पयत वाढला होता. या घटनांमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे, गोव्यातील एटीएमना स्किमिंग मशिन लावून त्याद्वारे लोकांना लाखोंचा फटका घालणा:या रोमानियनांच्या टोळय़ांचा उच्छाद गोवा पोलिसांनी उघडकीस आणला होता.