आल्तो - दाबोळी महामार्गावरील अपघातात २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 06:49 PM2018-10-29T18:49:29+5:302018-10-29T18:49:49+5:30
सोमवारी (दि.२९) पहाटे सडा, मुरगाव येथे राहणारा २७ वर्षीय अविनाश मारुती जाळगेकर हा तरुण दुचाकीने पणजीच्या दिशेने जात असताना आल्तो - दाबोळी महामार्गाच्या बाहेर असलेल्या मोठ्या दगडाला त्याच्या दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला.
वास्को - सोमवारी (दि.२९) पहाटे सडा, मुरगाव येथे राहणारा २७ वर्षीय अविनाश मारुती जाळगेकर हा तरुण दुचाकीने पणजीच्या दिशेने जात असताना आल्तो - दाबोळी महामार्गाच्या बाहेर असलेल्या मोठ्या दगडाला त्याच्या दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अविनाश चा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या बाहेर पोचून हा अपघात घडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने तो येथेच मरण पावला.
वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विकास देयीकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार पहाटे पाच वाजण्याच्या समारास सदर अपघात घडला. सडा भागात राहणारा अविनाश काही कामानिमित्ताने ‘एवियेटर’ दुचाकीने (क्र: जीए ०६ आर १६१८) पणजीच्या दिशेने जात होता. आल्तो - दाबोळी येथील ‘सेंट अॅथनी चेपल’ समोरील रस्त्यावर अविनाश जेव्हा पोचला त्यावेळी त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या बाहेर पोचून येथे असलेल्या मोठ्या दगडाला त्याच्या दुचाकीने जबर धडक दिली. ह्या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार बसून तो जागीच मरण पोचल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक विकास यांनी दिली.
सदर अपघाताची माहीती मिळताच पहाटे पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन मयत अविनाश याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या शवगृहात पाठवून दिला. सोमवारी पहाटे दुर्देवी रित्या मरण पोचलेला अविनाश हा मूळ बेळगाव, कर्नाटक येथील रहीवाशी असल्याची माहीती पोलीसांनी दिली. तो येथील एका हॉटेलमध्ये काम करण्याबरोबरच मोकळ््या वेळेत तो इलेक्ट्रीशनचे काम घ्यायचा अशी माहीती सूत्रांनी दिली. वास्को पोलीस सदर अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.