कळंगुट परिसरात २८ दलाल ताब्यात
By काशिराम म्हांबरे | Published: April 29, 2023 04:09 PM2023-04-29T16:09:17+5:302023-04-29T16:10:02+5:30
कारवाईसाठी पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.
म्हापसा- कळंगुट परिसरातील किनाºयावर येणाºया पर्यटकांना लुटणाºया त्यांची फसवणुक करणाºया दलालांवर कारवाई करून २८ दलालांना ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. उत्तर गोव्याचे अधिक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली तसेच पर्वरीचे उपअधिक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत वाळपई, आगशी तसेच कोलवाळ स्थानकाच्या निरीक्षकांनी भाग घेतला होता.
कारवाईसाठी पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. यात कळंगुटसोबत डिचोली, वाळपई तसेच इतर स्थानकावरील ६० हून अधिक पोलिसांचा समावेश करण्यात आला होता. कळंगुट परिसरातील विविध भागात दलालांवर देखरेख ठेवण्यासाठी या सर्व पोलिसांना साद्या वेषात मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी सुरु झालेली ही मोहिम रात्री उशारी पर्यंत सुरुच होते. यावेळी कळंगुट परिसरात येणाºया पर्यटकांना स्वत:कडे आकर्षीत करून त्यांना विविध प्रकारची आमीषे दाखवण्याच्या प्रयत्नात असताना या सर्व दलालांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या दलालातील बहुतेक दलाल हे इतर राज्यातील पण गोव्यात वास्तव्य करून राहणारे होते. यात कर्नाटक, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, राजस्थान, ओडिसा, हरयाणा, उत्तराखंड, मेघालय सारख्या राज्यातील होते.
ताब्यात घेण्यात आलेल्या या दलालांना नंतर कळंगुट पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले त्यांच्या विरोधात पर्यटन व्यवसाय कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यात आला. नंतर सर्वांना पुढील कार्यवाहीसाठी पर्यटन खात्यात हजर करण्यात आले. कळंगुट तसेच कांदोळी बागा सिकेरी येथील किनारी भागात पर्यटकांची दलालांकडून होणाºया फसवणुकी संबंधीच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. स्तानीकांनी, पर्यटनाशी निगडीत व्यवसायिकांनी या दलालांवर कारवाईची मागणी केली होती. स्थानीक पंचायतीकडून मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसेच पर्यटन मंत्र्यांना निवेदनही सादर केले होते. अशा प्रकारची कारवाई या पुढेही सुरुच राहणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली