‘मगोप’ लढवणार २८ जागा!

By admin | Published: December 31, 2016 03:13 AM2016-12-31T03:13:50+5:302016-12-31T03:20:08+5:30

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीवेळी मगो पक्ष एकूण २८ जागा लढवणार आहे. २२ मतदारसंघांमध्ये आम्ही उमेदवार निवडले

28 candidates to fight 'Magoop' | ‘मगोप’ लढवणार २८ जागा!

‘मगोप’ लढवणार २८ जागा!

Next

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीवेळी मगो पक्ष एकूण २८ जागा लढवणार आहे. २२ मतदारसंघांमध्ये आम्ही उमेदवार निवडले असून २८ जागा वगळता उर्वरित १२ जागांबाबत अन्य पक्षांच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे ‘मगोप’चे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.
वास्कोचे माजी नगराध्यक्ष मनेष आरोलकर यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी मगो पक्षात प्रवेश केला. आरोलकर यांचे स्वागत केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ढवळीकर म्हणाले की, एकदा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की अनेकजण मगो पक्षात प्रवेश करतील. वाळपई मतदारसंघातदेखील आम्ही उमेदवार निवडला आहे. तो मतदारसंघही मगोप लढवणार आहे. आमच्याकडे अनेक युवा व नवे उमेदवार आहेत. दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या आयातीची आम्हाला गरज नाही.
सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचसोबत मगोपची युती होईल काय, असे पत्रकारांनी विचारले असता, सुरक्षा मंचसोबत चर्चा सुरू आहे. युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय लवकरच होईल. आमचे व त्यांचे काही विषय आहेत, त्याबाबत अगोदर तोडगा काढावा लागेल. सासष्टी तालुक्यातील मतदारसंघांतही आमचे उमेदवार असतील. बारा जागांबाबत अन्य पक्षांच्या उमेदवारांचा विचार आम्ही करू शकू. मगो पक्ष हा कूळ-मुंडकारांचा व गरिबांचा पक्ष आहे व त्यामुळेच नवे तरुण या पक्षात येत आहेत.
ढवळीकर म्हणाले की, भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. पर्रीकर हे माझे मित्र आहेत; पण भाजपला ‘मगोप’ची गरज नाही; कारण त्यांचे २६ उमेदवार निवडून येतील, असे भाजपला वाटते. त्यामुळे निवडणूक होऊ द्या. मगो पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल, असे मला वाटते. लोक आमच्यासोबत आहेत, हे म्हार्दोळ येथील महालसा मंदिरात प्रचाराचा नारळ ठेवतानाही दिसून आले. त्या वेळी साडेचार हजार ‘मगोप’प्रेमी जमले होते. आम्ही कुणाशीच युती न करता निवडणुकीस स्वतंत्रपणे सामोरे जावे, असे २५ टक्के गोमंतकीयांना वाटते. आम्हाला भाजपने मंत्रिमंडळातून काढले ते बरे झाले; कारण त्या वेळपासूनच मगो पक्षाची ताकद वाढली व लोकांच्या अपेक्षाही ‘मगोप’कडून वाढल्या. गोव्यात सध्या २० हजार कोटींची जी रस्ता, पूलविषयक कामे सुरू आहेत, ती मी गडकरी व पर्रीकर यांच्या सहकार्याने मार्गी लावली.
(खास प्रतिनिधी)

Web Title: 28 candidates to fight 'Magoop'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.