विन्हेरे-चिपळूण, मंडुरे-मडगाव विभागात ३ तासांचा मेगा ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 08:40 AM2023-10-30T08:40:59+5:302023-10-30T08:42:03+5:30
विन्हेरे-चिपळूण विभागात गुरुवार, ३१ रोजी दुपारी १२:१० ते ३:१० वाजेपर्यंत रेल्वे सेवेवर होणारे परिणाम...
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: विन्हेरे-चिपळूण आणि मंडुरे- मडगाव जंक्शन विभागामधील मालमत्तेच्या देखभालीसाठी तीन तास मेगा ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार विन्हेरे-चिपळूण विभागात गुरुवार, ३१ रोजी दुपारी १२:१० ते ३:१० वाजेपर्यंत रेल्वे सेवेवर होणारे परिणाम असे आहेत ट्रेन क्र. ०२१९७ चा कोईम्बतूर- जबलपूर विशेष प्रवास 30 रोजी सुरू होणार असून, त्याचे मडगाव जंक्शन- चिपळूण स्थानकदरम्यान ९० मिनिटांसाठी नियमन केले जाईल. ट्रेन क्र. १०१०६ या सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसच्या ३१ रोजी सुरू होणाऱ्या प्रवासाचे सावंतवाडी रोड-चिपळूण स्टेशनदरम्यान ९० मिनिटांसाठी नियमन केले जाईल.
मडुरे-मडगाव जंक्शनदरम्यान ३१ रोजी १:२० ते ४:२० पर्यंत रेल्वे सेवेवर होणारे परिणाम असे आहेत ट्रेन क्र. १२०५१ या मुंबई सीएसएमटी मडगाव - जंक्शन असा प्रवास ३१ रोजी सुरू करणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवासाचे रत्नागिरी - सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान मिनिटांसाठी ८० नियमन केले जाईल. ट्रेन क्र. २२११९ या मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शनदरम्यान ३१ रोजी प्रवास सुरू करणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या प्रवासाचे रत्नागिरी-सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान ६० मिनिटांसाठी नियमन केले जाईल.
रेल्वे क्र. १२६१८ चा एच. निजामुद्दीन एर्नाकुलम जंक्शन असा प्रवास ३० रोजी सुरू होणार असून, या एक्स्प्रेसच्या प्रवासाचे कणकवली स्थानकावर २० मिनिटांसाठी नियमन केले जाईल. रेल्वे क्र. २२१४९ एर्नाकुलम जंक्शन-पुणे जंक्शन ३० रोजी प्रवास सुरू करणार असून, या एक्स्प्रेसच्या प्रवासाचे कारवार- मडगाव जंक्शन स्टेशनदरम्यान ५५ मिनिटांसाठी नियमन केले जाईल. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.