आमदार सैलकडून ३०० कोटीचे खनिज निर्यात, एसआयटीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 09:58 PM2018-04-17T21:58:00+5:302018-04-17T21:58:00+5:30

गोव्यातील खाण घोटाळ प्रकरणात सहभाग आढळून आलेले कारवारचे आमदार सतीश सैल यांच्या मल्लिकार्जून शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडने गोव्यातील ३०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या खनिज मालाची निर्यात केल्याचे एसआयटीला तपासातून आढळून आले आहे. एसआयटीकडून सैल यांना समवन्स बजावून २ तास चौकशी केली होती. 

300 crores mineral export from MLA Sail, SIT claim | आमदार सैलकडून ३०० कोटीचे खनिज निर्यात, एसआयटीचा दावा

आमदार सैलकडून ३०० कोटीचे खनिज निर्यात, एसआयटीचा दावा

googlenewsNext

पणजी - गोव्यातील खाण घोटाळ प्रकरणात सहभाग आढळून आलेले कारवारचे आमदार सतीश सैल यांच्या मल्लिकार्जून शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडने गोव्यातील ३०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या खनिज मालाची निर्यात केल्याचे एसआयटीला तपासातून आढळून आले आहे. एसआयटीकडून सैल यांना समवन्स बजावून २ तास चौकशी केली होती. 

सैल यांचा खाण घोटाळ््याशी प्रत्यक्ष स हभाग असल्याची माहीती  एसआयटीला मिळाल्यानंतर त्यांची चौकशी एसआयटीने सुरू केली होती. त्यात सैल यांची गोव्यातही मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. तसेच उत्तर गोव्यात त्याचा एक भुखंड असून त्यावर खनिज माल साठवून ठेवला जातो. गोव्यातील अनेक ट्रेडरशी त्याचा संबंध होता. मुख्य म्हणजे कायदेशीर आणि बेकायदेशीर ट्रेडरकडूनही त्यांनी खनिज माल नेला आहे. एसआयटीने काही ट्रेडरना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून ही माहिती एसआयटीला मिळाली. गोव्यातून बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात आलेला लोहखनीज हा ट्रेडर्सद्वारे या कंपनीला पुरविला जात होता. या कंपनीकडून त्याची नंतर निर्यात केली जात होती. खाण घोटाळ््यातील संशयित ट्रेडरच्या नोंदवहीत मल्लिकार्जून शिपिंगचा उल्लेख आढळला आहे. 

एसआयटीने समन्स बजावल्यानंतर पहिल्या समन्सला सैल एसआयटीपुढे उपस्थित राहिले नव्हते. परंतु दुस-या समन्सला ते उपस्थित राहिले. परंतु त्यापूर्वी पणजी सत्र न्यायालयाकडून अंतरीम अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतरच ते एसआयटीच्या कार्यालयात गेले. अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी ही खबरदारी घेतली होती.

Web Title: 300 crores mineral export from MLA Sail, SIT claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.