सरकारी नोकरी विकत घेऊ निघालेल्या१८ जणांना ३१ लाखांचा चुना; दोघांविरूद्ध गुन्हा नोंद
By वासुदेव.पागी | Published: February 15, 2024 06:44 PM2024-02-15T18:44:22+5:302024-02-15T18:44:36+5:30
सरकारी नोकऱ्या मिळतात म्हटल्यावर लोक किती जोखीम घेऊ शकतात याची प्रचिती देण्यारे प्रकरण आगशी पोलीस सद्या हाताळत आहेत.
पणजी: सरकारी नोकऱ्या मिळतात म्हटल्यावर लोक किती जोखीम घेऊ शकतात याची प्रचिती देण्यारे प्रकरण आगशी पोलीस सद्या हाताळत आहेत. सरकारी नेकरीचे आमिष दाखवून गोव्यातील १८ जणांना ३१ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे.
सासस्टीतील जास डिकॉस्टा आणि ज्वेन्सी डायस हे दोघे सरकारी नोकरी विकणारे दलाल असल्यी सारखे लोकांना पैसे द्या नोकऱ्या घ्या असे सांगत फिरत होते. त्याच्या या आमिषाला भुलून १८ जण तयार झाले. त्यांनी पैसे ३१ लाख रुपये जमवून संशयितांना दिले. पण, नोकऱ्या काही मिळाल्याच नाहीत. कधी मिळणार नोकरी अशी त्यांच्याकडे चौकशी केली असता ते मिळणार असेच सांगत होता. पण नंतर आपली फसवणूक झाल्याची त्यांना जाणिव झाला. एक पीढीत आल्टन सिल्वेरा यांनी पोलिसांत तक्रारी दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. आता ईतर पीढीतही तक्रारी नोंदवित आहेत. या प्रकरणात संषयितांना अटक केली जाऊ शकते.