३१ टक्के महिलांना वाटते असुरक्षित
By admin | Published: February 25, 2017 01:49 AM2017-02-25T01:49:20+5:302017-02-25T01:57:05+5:30
पणजी : पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या ३१.0३ टक्के महिलांना कामाच्या ठिकाणी असुरक्षितता वाटते. देशी पर्यटकांपासून त्यांना जास्त
३१ टक्के महिलांना वाटते असुरक्षित
पणजी : पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या ३१.0३ टक्के महिलांना कामाच्या ठिकाणी असुरक्षितता वाटते. देशी पर्यटकांपासून त्यांना जास्त उपद्रव होतो व धोकाही वाटतो. कॅसिनो तसेच इतर हॉटेल्समध्ये मद्यपी देशी पर्यटकांकडून शेरेबाजी तसेच गैरवर्तनाचेही प्रकार घडतात. अनेकदा लैंगिक अत्याचाराचे प्रकार उघडकीस येत नाहीत; कारण त्याबद्दल वाच्यता करायला महिला कर्मचारी घाबरतात, असे पाहणीत आढळून आले आहे.
सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम या संस्थेसाठी काम करणाऱ्या इवान्जेलिन आरेथवाला हिने पर्यटन उद्योगातील महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संशोधन केले आहे. मुंबईच्या निर्मला निकेतन कॉलेजमधून सोशल वर्कची पदवी त्यांनी घेतली आहे. या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन अॅड. कॅरोल कुलासो यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या प्रसंगी संस्थेचे सावियो फर्नांडिस हेही उपस्थित होते.
डिसेंबर २0१४ ते एप्रिल २0१५ या कालावधीत हे संशोधन करण्यात आले.
(प्रतिनिधी)