सरत्या वर्षात गोव्यात रस्त्यांवरील अपघाती बळींची संख्या 320

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 05:12 PM2017-12-30T17:12:04+5:302017-12-30T17:12:11+5:30

2017 साल संपायला केवळ एक दिवस बाकी असताना गोव्यातील रस्ता अपघातातील बळींची संख्या 320 वर पोचली आहे

320 deaths due to road accident in Goa | सरत्या वर्षात गोव्यात रस्त्यांवरील अपघाती बळींची संख्या 320

सरत्या वर्षात गोव्यात रस्त्यांवरील अपघाती बळींची संख्या 320

Next

सुशांत कुंकळयेकर
मडगाव : 2017 साल संपायला केवळ एक दिवस बाकी असताना गोव्यातील रस्ता अपघातातील बळींची संख्या 320 वर पोचली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण जरी 16 बळींनी कमी असले तरी आजची 31 डिसेंबरची रात्र वै:याची ठरु नये यासाठी डोळ्यात तेल घालून जागरुक रहाण्याची गरज आहे.
29 डिसेंबर्पयतच्या आंकडेवारीप्रमाणो गोव्यात 294 जीवघेणो अपघात झाले असून त्यात 320 जणांना मृत्यू आला आहे. 2016 साली रस्त्यावर मृत्यू येणा:यांचे प्रमाण 336 होते. त्यामुळे मागच्यावर्षीच्या तुलनेत यंदाचे वर्ष काहीसे चांगलेच म्हणावे लागणार आहे.
वाहतूक खात्याचे पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर यांच्याशी संपर्क साधला असता, 31 डिसेंबरच्या रात्री गोव्यात कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी रस्त्यावर जादा प्रमाणात वाहतुक पोलीस तैनात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विश्ोषत: कळंगूट, अंजुणा या भागात पर्यटकांची संख्या जास्त असते हे लक्षात धरुन वाहतुकीची कुठलीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी किनारपट्टी भागात अधिक पोलीस तैनात केले आहेत. याशिवाय मांडवी व जुवारी पुलावरही अधिक पोलीस तैनात केले जातील असे त्यांनी सांगितले.
यंदा दरवर्षीप्रमाणो सर्वात अधिक अपघाती मृत्यू मोटरसायकल स्वारांचे झाले असून यंदा ही संख्या 190 वर पोचली आहे. मागच्यावर्षी हे प्रमाण केवळ 164 होते. या मोटरसायकलच्या मागे बसलेल्यांना अपघातात मृत्यू येण्याचे प्रमाण 37 असून मागच्यावर्षीही एवढय़ाच लोकांना मृत्यू आला होता. त्याशिवाय इतर 20 वाहन चालकांना मृत्यू आला असून वाहनांतील इतर प्रवाशांच्या मृत्यूची संख्या 15 आहे.
यंदाची आणखी एक डोकेदुखी म्हणजे पादचा:यांच्या मृत्यूचे प्रमाण वर्ष संपायला दोन दिवस बाकी असताना एकूण 46 पादचा:यांना मृत्यू आला असून मागच्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण चारनी कमी आहे. इतर मृत्यूमध्ये 9 सायकलस्वार व तीन इतरांचा समावेश आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी जरी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी लहानशा गोव्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर होणारे अपघाती मृत्यू ही चिंतेचीच बाब असल्याचे मत गोवा कॅनचे रोलंड मार्टिन्स यांनी व्यक्त केले. विशेषत: पादचा:यांचे मृत्यू ही अधिक चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले.


2017 तील अपघातातील मृत्यू
एकूण जीवघेणो अपघात 294
दुचाकी चालक 190
दुचाकीच्या मागे बसलेले 037
इतर वाहन चालक 020
पादचारी 046
प्रवासी 016
सायकलस्वार 009
इतर 003

Web Title: 320 deaths due to road accident in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.