गोव्यात गुन्हे करून ३३३ विदेशी भूमिगत

By admin | Published: July 21, 2016 02:23 AM2016-07-21T02:23:21+5:302016-07-21T02:23:31+5:30

पणजी : विदेशी लोक गोव्यात येतात आणि गुन्हे करून कुठे जातात याचा काही ताळतंत्र राहिलेला नाही. मागील ५ वर्षांत गोव्यात आलेल्या ५८३

333 foreign underground by crime in Goa | गोव्यात गुन्हे करून ३३३ विदेशी भूमिगत

गोव्यात गुन्हे करून ३३३ विदेशी भूमिगत

Next

पणजी : विदेशी लोक गोव्यात येतात आणि गुन्हे करून कुठे जातात याचा काही ताळतंत्र राहिलेला नाही. मागील ५ वर्षांत गोव्यात आलेल्या ५८३ विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते; परंतु त्यातील ३३३ लोक अजूनही पोलिसांना सापडलेले नसल्यामुळे ते भूमिगतांच्या यादीत आहेत.
विदेशी लोकांनी गोव्यात जमिनी व इतर मालमत्ता बळकावल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते; परंतु हे लोक गोव्यात गुन्हे करूनही त्यांचे कुणी बिघडवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. विदेशी लोक गोव्यात येऊन गुन्हे करू शकतात असेच नव्हे तर गुन्हे करून पोलिसांना न सापडता भूमिगतही राहू शकतात, हे पोलीस खात्यानेच दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत अहे.
विदेशी नोंदणी विभागाचा ताबा असलेले पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ ते २०१६ या वर्षांत ५८३ विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंद झाले होते. त्यातील ३३३ लोक अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. या लोकांनी आपल्या देशात पळ काढला असावा, असे म्हणावे तर विदेशी विभाग नोंदणी खात्याच्या परवानगीशिवाय देशातील कोणत्याही विमानतळावरून ते जाऊ शकत नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: 333 foreign underground by crime in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.